ने.हि.कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम : एकूण निकाल ९७.९९ टक्के.

ने.हि.कनिष्ठ महाविद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम : एकूण निकाल ९७.९९ टक्के.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,२१/०५/२४ येथील नेवजाबाई हितकारिणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान ,कला व वाणिज्य शाखेचा निकाल ९७.९९ टक्के लागला असून यावर्षिही उत्कृष्ट निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम राखली आहे.

     

विज्ञान शाखेतून ज्ञानेश्वरी उरकुडेला ९२.१७ टक्के मिळाले असून ती सर्वप्रथम आहे तर रजत कामडी ८७.३३ टक्के,सिध्दी नाकतोडे ८६.१७ टक्के,अंकित लाडे ८६.०० टक्के, अनुष्का सोनुने ८५.६७ टक्के,वेदांत दोडके ८४.१७टक्के ,वैष्णवी कामीडवारने ८३.५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे.

     

वाणिज्य शाखेतून मोहिनी नवघडे ८९.३३ टक्के,रिया शिंदे ८६.५० टक्के,स्नेहल सिडाम ८६.०० टक्के,गौरी इडलावारला ८४.०० टक्के मिळाले आहेत.कला शाखेत प्रियाशिल चंदनखेडे ८५.१७ टक्के,महेश भोयर ८३.८३ टक्के,पूनम ढोरे ८१.८३ टक्के,योगिता चापले ८१.०० टक्के,सानिया गेडाम ८०.३३ टक्के मिळवून त्यांनी यश संपादन केले आहे.


या सर्व प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया,सचिव अशोक भैया, सदस्य प्रा जी एन केला,गौरव भैया, प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, संचालक प्रा विनोद नरड,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर व इतर प्राध्यापकवृन्द, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले असून पुढील भविष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !