वादळाच्या तळाख्यात पोर्ला रोडवर झाडे कोसळली ; तिन तास ट्रॉफीक ठप्प.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : दि,22 मे च्या सांयकाळी 8 :00 वा. चे दरम्यान जोरदार वादळाच्या तळाख्याने वसा पोर्ला ते काटली पर्यंतच्या रोडवर असंख्य झाडे रोडवर पडल्यामुळे चार तास ट्राफिक बंद होती. त्यामुळे अनेक ट्रक चालक व फोर व्हिलर वाले जिव मुठीत धरून अडकले होते.
रात्रौ 8 :00 वा. चे दरम्यान फक्त वसा ते काटली पर्यंतच वादळी वाऱ्याने रुद्ररुप धारण करून फँक्टरी ते पोर्ला दरम्यान मुख्य रोड वर मोठे झाड पळल्यामुळे चार तास ट्राफीक बंद होती.ट्रकाची उभी लाईन पोर्ला ते काटली पर्यंत उभी होती. काही फोर व्हिलर वाले पोर्ला गावातून डॉ.विजय रामटेके यांच्या शेताच्या रोड जवळून गाड्या काढून आवागमन करीत होते.
10 : 30 वा. चे दरम्यान स्क्रेन ला पाचारण करण्यात आले व झाडे हटवून जवळपास रात्रौ 12 : 00 वा.चे सुमारास पोर्ला मार्ग सुरु झाला.