पालापासून विमानापर्यंतचा प्रवास पुस्तकांमुळे घडला स्व.किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमाला समारोप. - अशोक पवार.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगाव - ०२ मे २४ " चांगल्या शिक्षकांमुळेच मी थोडाफार शिकलो.एकाच पालात पूर्ण कुटुंब राहत होत.गुरुजीनी पुस्तक हाती देऊन शिक्षणाची गोडी लावली.आमचे बिराड गावोगावी फिरत होते अवांतर वाचन करत गेलो.विविध अनुभव घेतले त्यातून 'बिराड'ची निर्मिती झाली अन् मग पालापासून विमानापर्यंतचा प्रवास पुस्तकांमुळे घडला." असे मार्मिक विवेचन प्रसिद्ध साहित्यिक अशोक पवारांनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात स्व.किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमालेत समारोपप्रसंगी ' बिराडची निर्मितीप्रक्रिया ' विषयावर बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी एच.गहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे ज्येष्ठ सदस्य प्रा सुभाष बजाज,उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,प्रा विनोद नरड,'स्टार्टअप इंडा'वर विचार मांडणारे प्रा.अजय खोब्रागडे, प्रभारी डॉ वर्षा चंदनशिवे इ.मान्यवर उपस्थित होते.
सदर व्याख्यानमालेचे उद् घाटन संस्था सचिव अशोक भैयांनी केले.यानंतर लक्ष्मीकांत लाडूकरांनी ' हायू टू किप युवरसेल्फ फिट ' विषयावर विचार व्यक्त केले.दुस-या दिवसांपासून डाॅ.ज्योती दुपारेंनी 'जाणता राजा ' राजू मेश्रामांनी 'आज पु.ल.असते तर!' डॉ दर्शना उराडेंनी 'केमिस्ट्री इन डेली लाईफ 'डाॅ मोहन कापगतेंनी 'इतिहासातील प्रेमकथा व स्मारके 'प्रा.शिरीन खान ' टू बी आर नाट टू बी ' डॉ सुभाष शेकोकरांनी ' ताण -तणाव व्यवस्थापन 'प्रा.पी.डी.परातेंनी 'सायबर सिक्युरीटी 'प्रा चंद्रशेखर गणवीरांनी ' म.गांधीची सामाजिक व राजकीय बंडखोरी ' डाॅ पद्माकर वानखडेंनी 'वैदर्भिय व-हाडी बोली ' प्रा रुपेश वाकोडीकरांनी ' कृत्रिम बुद्धिमत्ता ' अशा विविध विषयांवर आठ दिवस वक्त्यांनी आपले विचार मांडले.
समारोपप्रसंगी संचालन डॉ.पद्माकर वानखडेंनी तर आभार डॉ वर्षा चंदनशिवेंनी व्यक्त केले.यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर,प्रा मनिषा लेनगुरे,प्रा मेंघरे, डॉ योगेश ठावरी यांनी सहकार्य केले.उपस्थितीत प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ भाऊसाहेब जगनाडे, प्राचार्य डॉ क्रिष्णा राऊत,प्रा विजय मुळे, प्रा केळझरकर,डॉ धनराज खानोरकर,प्रा अनिल कोडापे, डॉ खिजेंद्र गेडाम,डॉ रेखा मेश्राम,डॉ किशोर नाकतोडे व इतर प्राध्यापकवृन्द उपस्थित होते.