महिला व तरुणींचा कलागुणांना प्रोत्साहन देणारा सहज सुचलं ग्रुप. - कविता दिकोंडावार
एस.के.24 तास
चंद्रपूर : कला,साहित्य सामाजिक,क्रीडा या सोबतच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा सहज सुचलं हा व्हाॅट्सअप गृप असून तो आज महाराष्ट्रभर प्रसिद्धीच्या झोतात असल्याचे मत सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या चंद्रपूर च्या कविता दिकोंडावार यांनी आज एस.के.24 तास मुलाखती दरम्यान किरण घाटे प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केले.
सहज सुचलं या गृपची यशस्वीपणे धूरा सांभाळणा-या नागपूरच्या जेष्ठ मार्गदर्शिका, योगशिक्षिका ,महिला कास्तकार तथा समाजसेविका मायाताई कोसरे व अतिदुर्गम भागातील राजूराच्या सुपरिचित साहित्यिक व शिक्षिका अधिवक्ता मेघा धोटे यांच्या बद्दल सर्व सदस्यगणांना आदर असून त्यांनी सुरू केलेल्या या गृपला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळतोय असल्याच्या सामाजिक महिला कार्यकर्त्या कविता दिकोंडावार पुढे म्हणाल्या.
सहज सुचलंची विदर्भाच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात महिला सभासद संख्या सर्वाधिक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.चंद्रपूर निवासी रंज्जू दिलीप मोडक ह्या सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका आहे तर मूलच्या समाजसेविका नलिनी आडपवार ह्या सहसंयोजिका म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सहज सुचलंची धुरा यशस्वीरित्या सांभाळीत आहे.
विशेष म्हणजे मुल नगरीत राष्ट्रीय लोकहितचे दत्तात्रय समर्थ व सामाजिक महिला कार्यकर्त्या,अर्चना समर्थ यांनी आयोजित केलेल्या एका पुरस्कार समारंभात सहजं सुचलंच्या एकूण १२ कर्तृत्वान महिलांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला होता.