विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे व्याहाड बुज येथे आर्थिक मदत.
सुदर्शन गोवर्धन - प्रतिनिधी
सावली : दिनांक,१४ मे २०२४ तालुक्यातील मौजा.व्याहाड बुज,येथे दोन नागरिकांना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे ब्रेन हॉमरेज व अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व श्री.किसान सहकारी संस्थेच्या माजी उपाध्यक्ष श्रीमती निर्मलाताई वासेकर यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,स्व.रामभाऊ म्याकलवार वय ५७ वर्षे यांना ब्रेन हॉमरेज होऊन लवका मारल्याने ते उपचारा दरम्यान मृत पावले,त्यांचा पश्चात फक्त त्यांची पत्नी असल्याने व उदर्निवाहासाठी दुसरे कोणतेही व्यवसाय अथवा शेती नसल्याने आर्थिक मदत देण्यात आली व श्री.रवी शेरकी वय ३५ वर्षे हे काम-धंदासाठी बाहेर गेले असता दुचाकीने त्यांचा अपघात झाला यात त्यांच्या पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे आर्थिक मदत देण्यात आली.
दोन्ही रुग्ण गरीब कुटुंबातील असून भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,शेरकी व म्याकलवार कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी व ग्राम.सदस्य श्री.सुनील बोमणवार,श्री.दीपक गद्देवार,मा.जयंत संगीडवार माजी सरपंच श्री.पितांबर वासेकर,श्री. शंकर मेश्राम,श्री.एकनाथ वासेकर,श्री.राहुल वासेकर आदी उपस्थित होते.