शहरातील शाळा ग्रामीण भागातील शाळेसाठी डोकेदुखी.

शहरातील शाळा ग्रामीण भागातील शाळेसाठी डोकेदुखी.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : दिनांक,१२ /०५/२४ महाराष्ट्र राज्या बरोबर जिल्ह्यातील शासकीय, खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांना ०२ मे पासून उन्हाळी सुट्ट्या लागल्या. सुट्ट्या लागण्याच्या एक महिना अगोदर पासून शाळेचे संस्थाचालक, मुख्याध्यापक हे आपल्या सहकाऱ्यांशी विचार विनिमय करून शाळेतील विद्यार्थ्यांची वर्गवार असलेली पटसंख्या कायम ठेवण्यासाठी नियोजित आराखडा तयार करून विद्यार्थी मिळविण्यासाठी तयारीला लागतात. 

कारण आपल्या सहवासात असलेला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सहकारी बांधव हा अतिरिक्त ठरू नये त्यासाठी नियोजित असलेली पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी खेड्यापासून तर शहरापर्यंत चे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी  निवडणुकीच्या उमेदवाराप्रमाणे पालकांच्या घरी एक एक विद्यार्थ्यांसाठी भूख तहान विसरून,परिश्रम करून जात असतात.त्यांच्या परिश्रमाला थोड्याफार प्रमाणात यशही येते आणि विद्यार्थी संख्या ही कायम राहुन शाळा नित्य नियमाने सुरळीत सुरू राहते.


परंतु यावर्षी चे चित्र हे खेड्यातील खाजगी माध्यमिक शाळांसाठी घातक ठरत आहे कारण ब्रह्मपुरी शहरातील शाळा चालक,मुख्याध्यापक  हे अहेरनवरगाव,पिंपळगाव(भोसले),नांदगाव भालेश्वर या कमी अंतरापासून तर गांगलवाडी, आवळगाव मुडझा या ३५ - ४०,किलोमीटर दूर अंतरा पर्यंत च्या गावा पर्यंत त्यांनी विद्यार्थ्यांसाठी पायपीट सुरू केलेली आहे.


विद्यार्थ्यांच्या पालकांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून,विद्यार्थ्यांची ने - आण करण्यासाठी स्कूल बस सारखी वाहतुकीची साधने उपलब्ध करून खेड्यातील विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी आपापल्या शाळेत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. 


त्यामुळे ज्या गावच्या विद्यार्थी संख्येवर त्या ठिकाणची शाळा अवलंबून होती त्याच शाळेत विद्यार्थी मिळणे खूप कठीण झाले आहे. पालक खेड्यातील शिक्षणापेक्षा शहरातील शिक्षण बरे आहे शहरात विद्यार्थी चांगला शिकतो या भोळ्या वाणीच्या व अन्य आर्थिक, सोयी सुविधांच्या प्रलोभनाला बळी पडतो आणि आपल्या पाल्यांना  ब्रह्मपुरी शिक्षणासाठी पाठवीत आहे.


त्यामुळे ब्रह्मपुरीतील काही शाळा ह्या खेड्यातील शाळेसाठी  मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. विद्यार्थी संख्येचा खेड्यातील शाळेवर होणारा विपरीत परिणाम व भविष्यात होणारा मोठा धोका ओळखून शाळा चालकांना,मुख्याध्यापकांना आपल्या   शाळेतील पटसंख्या कमी होईल या भीतीने 


ब्रह्मपुरी तालुक्यातील खेड्यातील खाजगी शाळेतील मुख्यध्यापक संघाने बैठकीचे आयोजन करून ब्रह्मपुरी व इतर शहरातील संस्था चालकांनी, मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने दाखवून विद्यार्थी ओढण्याचा जो प्रकार त्यांनी चालवला आहे तो थांबवावा आणि शाळेत कमी असलेली शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संख्या भरण्यासाठी परवानगी द्यावी अशा प्रकारचे निवेदन त्यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक चंद्रपूर,उपसंचालक शिक्षण विभाग नागपूर,संचालक शिक्षण विभाग पुणे व शिक्षक आमदार सन्माननीय अडबाले साहेब यांना दिले आहे. 


 खेड्यातील विद्यार्थी ब्रह्मपुरी सारख्या शहरात न जाता शहरातील शाळांमध्ये ज्या सोयी सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात त्या आपल्याही शाळेत परिपूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त करून गावचा विद्यार्थी व आसपासच्या  खेडेगावातील विद्यार्थी आपल्या शाळेत शिक्षण घेतील यासाठी त्यांनी कंबर कसली  आणि विद्यार्थी पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी ऑटोकाठ प्रयत्नाची पराकाष्टा करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !