समाजातील अधश्रध्दा पारंपारिक रुढी परंपरेला नाकारुन.
★ महात्मा फुले यांच्या सत्यधर्मावर विश्र्वास ठेवून आपल्या कोमल नावाच्या मुलीचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केला.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
सिंदेवाही : समाजातील अधश्रध्दा पारंपारिक रुढी परंपरेला नाकारुन महात्मा फुले यांच्या सत्यधर्मावर विश्र्वास ठेवून आपल्या कोमल नावाच्या मुलीचे विवाह सत्यशोधक पद्धतीने केला चंद्रपूर जिल्ह्यातील वनाने व तलावाने वेढलेल्या गावात महात्मा फुले व सावित्रीआई फुले विचारांचा प्रभाव जोर पकडला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गुजेवाही येथील शेतमजुर अशिक्षित होतकरु आशाताई व काशीनाथ चौधरी यांची सुकन्या कोमलताई हिचा विवाह मुल तालुक्यातील भेजगाव येथील अनुसयाताई व गणपत मोहुर्ले यांचे सुपुत्र राहुल यांचेशी दि १!०५!२०२४रोज बुधवारला गुजेवाही येथे वधूचे मंडपी सत्यशोधक पद्धतीने सपन्न झाला.
समाजातील अधश्रध्दा जुन्या पारंपारिक चाली रिती अशा विचारांना नाकारुन क्रातीसुर्य महात्मा फुले व क्रातीजोती सावित्रीआई फुले विचार स्विकारुन कोमलताई व राहुल यांनी गुजेवाही येथील काशीनाथ चौधरी यांचे घरी आपला विवाह सत्यशोधक पद्धतीने लावला यांच्या विवाहाचे समाजात गावात व परिसरात कौतुक होत आहे,सत्यशोधक विधीकर्ते सुनिल कावळे यांनी प्रथम वधुवराना दिप प्रवज्लन करण्यास सांगीतले,महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करुन वधवराच्या आईवडीलाचा सर्वात करण्यात आले,जोतीसावित्री वंदना घेवून ,वधूवराना प्रतिज्ञा देण्यात आली,प्रतिज्ञामध्ये व्यसन व्यभीचार करणार नाही,खोटं बोलणार नाही अशी प्रतीज्ञा देण्यात आली.
वधूवरांना उभे करुन त्याच्या हातात हात देवून महात्मा फुले रचीत मंगलाष्टक म्हणण्यात आले,मंगलाष्टक झाल्यानंतर वधूवराकडुन शपथ वदवण्यात आली,नवदाम्पत्याला सन्मानपत्र व सुनिल कावळे लिखित क्रातीकारक मायबाप ग्रथ व सत्यशोधक विधी पुस्तक देवून सन्मान करण्यात आला.
सत्यशोधक विधीकर्ते सुनिल कावळे याची आर्थीक परिस्थिती हलाखीची असुन फुले दाम्पत्याचे विचार त्याच्या नसानसात आहे,असा सत्यशोधक विधीकर्ता चद्रपुर गडचिरोली जिल्ह्यात निर्माण होईल का ? असा प्रश्न सत्यशोधक विवाहाप्रसगी गुजेवाही येथील येथील माळी समाज पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सत्यशोधक विवाह सोहळ्याला गुजेवाही येथील माळी समाजाचे अध्यक्ष सुभाष शेंडे,कोषाध्यक्ष हरीचद्र गुरनुले,गुरु शेंडे सर कलावंत आघाडी,किरण बोरुले सर सामाजीक कार्यकर्ते,भगवान दुर्गे सर वन समीती सचिव गुजेवाही,चंद्रकांत मोहुर्ले ग्रा प सदस्य गुजेवाही,व आप्त नातेवाईक व गावकरी पाहुणे मडळी उपस्थित होते या विवाहाची चर्चा गावात व परीसरात होत आहे.