मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : महादवाडी येथील शेतकरी प्रशांत चुधरी यांनी माझ्या शेतातून ते पाल नदी पर्यंत रस्ता करावा अश्या प्रकारचे बयान १०० रुपया च्या स्टॅपवर संमती पत्र शासनाला सादर केल्यानंतर आता मात्र माझ्या शेतातून रस्ता देणार नाही म्हणुन सदर रस्त्याचे कामच बंद केल्यामुळे इतर शेतकऱ्यानी आपल्या शेतात ट्रॅक्टर न्यावे कसे त्यामुळे ऐन हंगामात शेतकऱ्याचे अथोनाथ नुकसान होणार आहे.
तरी शासनाची व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या प्रशांत चुधरी यांचेवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.व झालेल्या कामाची चौकशी करावी अशी मागणी नुकसाग्रस्त कास्तकार, मुकुंदराव उंदिरवाडे,रुषी रामटेके महादवाडी ,वसंत धर्माजी भोयर गोगांव,रविंद्र भरडकर गोगाव आदिनी तहसिलदार गडचिरोली व ठाणेदार पोलीस स्टेशन गडचिरोली यांचेकडे केलेली आहे.
सन २०२१ पासुन सदर रस्त्याचे काम ग्रामपंचायत चुरमुरा यांनी केले परंतु निधी अभावी काम अपुरेच राहील.सन २०२३ - २४ मध्ये निधी उपलब्ध होतात ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामसेवक शेतावर गेले. असता चौधरी यांनी शेतातून रस्ता देण्यास असमर्थता दाखविली त्यामुळे यावर्षी सुद्धा काम अपुरेच राहणार असून शासनाची व कास्तकाराची फसवणुक करणारे प्रशांत चौधरी यांचेवर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.
व त्रस्त कास्तकाराना न्याय मिळवून घ्यावा अशी मागणी दिव्याग कास्तकार मुकुंदराव उंदिरवाडे यांनी शासनाकडे केलेली आहे