शतीश दिवाकर कुंभारे यांचे दुखत: निधन.
मुनिश्वर बोरकर -
गडचिरोली : रामनगर गडचिरोली येथील रहिवासी सामाजीक कार्यकर्ते दिवाकर कुंभारे यांचे चिरजिव शनीश दिवाकर कुभारे २८ यांचे दुखतः निधन झाले. शनीश हा काही कामानिमित बाहेरगावी गेला असता गावाकडे येताना दि. १३ मे चे रात्रौ ११ वाजता येतांना त्यांचा गाडीवरील तोल जावून नवेगांव जवळील एका उभ्या ट्रकला धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व गाडीवर बसले असलेले दोघेजन सुद्धा गंभीर जखमी झालेत त्यांना लगेचच सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती केले असता डॉक्टरानी नागपूर येथे हलविण्यास सांगीतले वाटेतच ब्रम्हपुरी जवळ शनीशची प्राणज्योत मावळली.
गडचिरोली डॉक्टरानी मृत्यु घोषीत केला. मनमिळावू स्वभावाचा शनीश यांच्या दुखतः निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज दि. १४ मे ला दुपारी ४ वाजता त्यांचे अंत्यसंस्कार कठाणी नदिघाटावर करण्यात येणार असुन त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येइल असे दिवाकर कुंभारे यांनी सांगीतले