ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सुयश.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२२/०५/२४ नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने.हि. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरीचा इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९३.२२ टक्के लागला असून महाविद्यालयाने ब्रम्हपुरी तालुक्यातून कला शाखेत उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.
ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय ब्रम्हपुरी येथून गौरव सोमेश्वर बर्लावार हा विद्यार्थी ८६.५० टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयातून प्रथम आला आहे. कु.अंशू देवराव देशमुख ही विद्यार्थिनी ८१.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय, तर कु.रुतिका माणिक राऊत ही विद्यार्थिनी ७७.०० टक्के गुणांसह तृतीय आली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अशोक भैया तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य,जी.एन.रणदिवे, उपप्राचार्य के.एम.नाईक,पर्यवेक्षक,ए.डब्ल्यू.नाकाडे, प्रा. प्रकाश जिभकाटे,डॉ.पंकज बेंदेवार,प्रा.कु.नितू खाडीलकर तथा सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.