सार्वजनिक ठिकाणी महिला पोलिस तैनात करावे मागणी. - कुसुमताई अलाम

सार्वजनिक ठिकाणी महिला पोलिस तैनात करावे मागणी. - कुसुमताई अलाम


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


गडचिरोली : महिलांना कामानिमित्ताने कधीही रात्री बेरात्री घराबाहेर पडावे लागते.अशावेळी महिलांची सुरक्षितता धोक्यात येण्याच्या घटना सतत घडत असतात.अशीच घटना धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील बसस्थानक परिसरात घडली.


एक आदिवासी महिला   सायंकाळी 6:00.वा. मजुरी काम संपवून ती मुलासह नवापूर येथील घरी जाण्यासाठी निघाले पण त्यांना  बस मिळाली नाही.रात्री 11 चे सुमारास एका पिकअप गाडीतून दोघं येवून विचारपूस करु लागले.


आणि महिलेस मुलासमक्ष ओढत नेऊन आळीपाळीने पाशवी वृत्तीने बलात्कार केला.ही निंदनीय घटना आहे.अशा प्रकारच्या घटना पुढे घडू नयेत यासाठी महाराष्ट्रातील सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला पोलिस तैनात ठेवण्यात यावे व पिडीत महिलेला न्याय मिळावा.


यासाठी मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्फत महामहीम राज्यपाल मा.मुख्यमंत्री,मा गृहमंत्री,महाराष्ट्र, यांच्या कडे निवेदनातून मा.कुसुमताई अलाम आदिवासी सेवक तथा माजी जि प सदस्य,मा.विलास निंबोरकर,मा.उपेंद्र रोहणकर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती.मा सुधाताई चौधरी माळी समाज संघटना ,जन अधिकार मंच गडचिरोली यांनी मा.जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेशी चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !