चुरमुरा येथे ग्रामशाखा गठीत बुद्ध विहारातून बुद्ध धम्माचा प्रचार व्हायला पाहीजे. - सरपंच,राजेश लिंगायत
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
आरमोरी : चुरमुरा येथील बुद्ध विहारात भव्य दिव्य बुद्धाची मुर्ती आहे.यातूनच बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य आपण करावे.तरच भारत बौद्धमय बनू शकेल अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन किटाळी ग्रामपंचायत चे सरपंच,राजेश लिंगायत यांनी केले.
चुरमुरा येथे ग्रामसभा गठीत करण्यात आली.सदर बैठकीला भीमराव रामटेके चुरमुरा,भीमराव बारसागडे आकापूर,हरेन्द्रा मेश्राम देऊळगाव, चुरमुरा बौद्ध समाजाच्या अध्यक्षा,प्राजंल रामटेके आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यकारणीत अध्यक्षा मिना शेन्डे,उपाध्यक्षा चंद्रकला रामटेके,धनिराम रामटेके सचिव वर्षा रामटेके सहसचिव माधुरी रामटेके संघटक तर सदस्य म्हणुन अनंता शेंडे,राहुल शेंन्डे,अविनाश रामटेके,विशाखा शेंन्डे,भारती शेंडे,भारती रामटेके आदिंची निवड करण्यात आली.बुद्ध विहारात त्रिशरण पंचशिला उपस्थितांनी ग्रहण केले.