सावली तालुक्यातील साखरी येथे नोटीस देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला. ★ भूमी अभिलेख विभागाने स्वतःत नोटीस न देता सदर व्यक्ती एकमेकांसोबत बोलत नसतांना नोटीस का बरं जखमी व्यक्ती जवळ दिले.या घटनेस जबाबदार कोण.?

सावली तालुक्यातील साखरी येथे नोटीस देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला. 


भूमी अभिलेख विभागाने स्वतःत नोटीस न देता सदर व्यक्ती एकमेकांसोबत बोलत नसतांना नोटीस का बरं जखमी व्यक्ती जवळ दिले.या घटनेस जबाबदार कोण.?

 

सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : सावली तालुक्यातील साखरी येथील सुरेश मारोती भूरसे यांनी भूमी अभिलेख विभागाकडून मिळालेली नोटीस घरी नेऊन दिल्याने मंगेश मुळेवार नामक व्यक्तींनी चाकूने डोक्यावर प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना दि.19 मे ला रात्रौ 9.15 वा.च्या सुमारास घडली.सदर जखमी व्यक्तीस नागपूर रुग्णालयात भरती केले असून त्यांच्या वर उपचार चालू आहे अशी माहिती आहे.


गावालगत असलेल्या शेतीची समस्या असताना मोजमाप करिता भूमी अभिलेख विभागाला कळविले आणि सदर जागेचे मोजमाप करण्यासाठी भूमी अभिलेख तर्फे नोटीस पाठविण्यात आल्या होत्या.त्याच नोटीस इतर शेतकऱ्यांना देण्यास सुरेश भुरसे यांना देण्यात आले.


अशी गावात चर्चा आहे सदर नोटीस घेऊन सुरेश भुरसे हे मंगेश मुळेवार यांच्या घरी गेले असता अचानक त्यांच्यावर चाकूचा हल्ला झाला.हल्ला होताच आपला जीव मुठीत घेऊन आपल्या घराकडे सुरेश भुरसे यांनी धाव घेतली पण,मंगेश मुळेवार यांनी पाठलाग करीत 100 ते 150 मीटर लांब हा हल्ला चालूच ठेवला. 


घराजवळ येथेच त्यांनी माघार घेतली.जखमी अवस्थेत सुरेश यांनी घरी येत जागेवर कोसळला.लगेच घर च्या व्यक्तींनी त्यांना पाहून दवाखान्यात नेण्याची तयारी केली.हा थरारक प्रकार गावातील अनेक लोकांनी पाहिला.


सुरुवातीला त्यांना वाटले की,चप्पल नी मारीत असावे पण रक्ताचे शिथोडे पडताच हे चाकुचेच वार आहे हे समजले,आपण सोडवायला गेलो तर आपल्यावर हल्ला होऊ शकतो या भीतीने कुणीही सामोरे गेले नाहीत तर उलट आम्ही काहीच बघितल नाही अशी तिथे असणाऱ्या लोकांची भूमिका आहे.


सुरेश भुरसे यांच्या डोक्यावर तसेच मानेवर मोठ्या प्रमाणात अंदाजे चार वार झाले आहेत अशी गावात चर्चा आहे.सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असून पोलिस निरीक्षक जिवन राजगुरू यांनी तातडीने गडचिरोली रुग्णालयात धाव घेतली असून या सर्व घटनेची माहिती घेणार आहेत.


सदर घेटनेला वेगळं वळण म्हणजेच भूमी अभिलेख विभागाचे नोटीस असताना आणि त्यांचेच काम असताना आणि सदर व्यक्ती एकमेकांसोबत बोलत नसतांना नोटीस का बरं दिले.सदर विभाग कामचुकारपणा करीत असून या घटनेला जबाबदार कोण ? असा प्रश्न गावातील व्यक्ती करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !