भरधाव वेगाने सुरु असलेली रात्रीची अवजड वाहतूक बंद करण्याकरिता तब्बल ३ तास अवजड वाहतूक अडवून धरली. - श्री.सुरज ठाकरे
एस.के.24 तास
राजुरा : चुनाळा व बामणवाडा मार्गावरून रोज रात्री भरधाव वेगाने विशेष सुरजागड कंपनी व आर्यन कोल वॉशरी कंपनीसह इतरही विविध कोळसा व सिमेंट कंपन्यातील सुरू असलेली ओव्हरलोड अवजड वाहतूक ही गावातील रहदारीच्या रस्त्यावररील ब्रेकर वरून गाडी सावकाश नेण्याऐवजी चालक वाहतूक नियमांचे पालन न करता सुसाट भरधाव वेगाने गाड्या चालवीत असतात. व या भागातील काही गावालगत असलेल्या रोडांवर ब्रेकर नसल्याने या परिसरातून या कंपनीतील गाड्यांचे गतीवर नियंत्रण नसल्याकारणाने याआधी देखील या भागात बरेचदा दुर्घटना घडलेल्या आहेत.
भविष्यात आणखी कुठली दुर्घटना होऊ नये या उद्देशाने गावातील संताप्त नागरिकांसह जय भवानी कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री. अनिकेत मेश्राम तथा आम आदमी पक्षाचे युवा तालुका अध्यक्ष,राजुरा श्री. रोशन बंडेवार तथा सहकारी यांनी आम आदमी पक्षाचे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनात दिनांक,४/५/२०२४ रोजी रात्री १०:१५ वा च्या सुमारास तब्बल तीन तास अवजड वाहतूक अडवून धरली.
यावेळेस या कंपन्यातील वाहन चालकांना आप पक्ष राजुरा व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह संतप्त नागरिकांनी चांगलाच धडा शिकवला.व भविष्यात असेच सुरू झाले तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील करतात. हे सर्व होत असताना वाहतूक कोंडी जास्त प्रमाणे वाढून नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता तात्काळ राजुरा पोलीसांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
व पोलिसांनी देखील चालकांना नियमांचा पाळा सांगत नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतूने गतीवर नियंत्रण ठेवून गाडीत चालवण्याचे सांगितले. यावेळेस उपस्थित आम आदमी पार्टी व जय भवानी कामगार संघटनेचे पदाधिकारी तथा सहकारी अभय अवदुत, मयुरभाऊ,चेतन्य बक्षी, युगा वाघमारे, दर्शन नगराडे, रोहित पुल्लीवार, लव डिगे, कुश डिगे, आदर्श नगराडे, नितिन भसारकर, शेरा नगराडे, अमेय कडुकर, प्रनय नगराडे, गोलु कोडापै, दादु कोडापै, सकेत कोडापै, गणेश सोयाम, दादु टेकाम, अमोल, प्रकाश किनेकर, देवा कुभळे, प्रशांत अवदुत, प्रनय अवदुत, दिवक नगराडे आदी सहकारी उपस्थित होते.