मराठा सेवा संघ चंद्रपूरच्या वतीने शिक्षणमंत्री,दिपक केसरकरांना निवेदन.
★ जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्फतीने केले निवेदन सादर.
एस.के.24 तास
चंद्रपूर : भारत सरकारच्या नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम 2020 ला आदर्श मानून महाराष्ट्र शासनाने नूतन शैक्षणिक धोरण तयार केले आहे. एससीआरटी चे संचालक राहुल रेखावार यांनी तसें पत्रक काढून महाराष्ट्रातील जनतेला त्यात काही सूचना व आक्षेप असल्यास कळवाव्या असे म्हटले. यासाठी शासनाने 23 मे ते 3 जून हा कालावधी दिला. परंतु अभ्यासक्रमात समाविष्ट भाग हा मनुस्मृतीचा असून त्यात 330 ए -4 साईज च्या पानात असून हार्ड कापी काढून ते सविस्तर वाचून घेण्यास बराच वेळ लागतो आहे.
म्हणून शासनाने वरीलप्रमाणे दिलेला वेळ हा अतिशय कमी असून तो वाढवून दि. 10 ऑगस्ट 2024 करावा अशा मागणीचे निवेदन मराठा सेवा संघ चंद्रपूरच्या वतीने चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा तर्फे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना देण्यात आले.
निवेदन सादर करते वेळी प्रदेश उपाध्यक्ष, मराठा सेवा संघचे दिपक जेऊरकर जिल्हासचिव मराठा सेवा संघचे सुरेश माळवे , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रा.दिलीप चौधरी शंकरराव लोनगाडगे, विनोद थेरे,अर्चना चौधरी, लताताई होरे, संजय बोटरे, आदिं पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.