नायब तहसिलदार मा.एस.आर.कावळे व त्यांच्या सहचरणी यांनी महापुरुषाच्या विचारांना प्रेरित होऊन सत्यशोधक गृहप्रवेश केला.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चामोर्शी : दिनांक 10/5/2024 रोजी चामोर्शी शहरातील उच्च विद्याविभूषित तथा तहसील कार्यालय चामोर्शी,येथे उच्च पदावर कार्यरत नायब तहसिलदार मा.एस.आर.कावळे व त्यांच्या सहचरणी यांनी महापुरुषाच्या विचारांना प्रेरित होऊन सत्यशोधक गृहप्रवेश केला.गृहप्रवेश सावित्रीमाई फुले व महात्मा फुले यांच्यासह आपले निसर्गविलिन आई बाबाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
त्यानंतर सुरवातीला सामूहिक जोति- सावित्री वंदना घेण्यात आली.नंतर विधीकर्ते सुनिलजी कावळे यांनी महात्मा फुले लिखित 10 अखंडाचे वाचन तसेच त्याचा अर्थ समजावून सांगण्यात आला.शेवटी सत्यधर्माची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी कावळे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
पहिल्यांदाच झालेल्या महामानवाच्या विचारधारेतील गृहप्रवेशामुळे अनाठायी होणारा खर्च व शारीरिक त्रास कमी झाल्यामुळे परिवारात समाधान दिसले.याकरिता सत्यशोधक विधीकर्ते सुनील कावळे व मनोज सोनुले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.