भूमी अभिलेख महिला कर्मचारी पाल यांच्यावर कार्यवाही करण्याबाबत सावली शहर काँग्रेस कमिटीचे प्रशासनास निवेदन.
★ भूमी अभिलेख महिला कर्मचारी पाल यांच्या गैरजबाबदार वर्तवणुकीमुळे अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :०८ मे २०२४ येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कामे संबधित भूमी अभिलेख अधिकारी पाल मॅडम यांच्या गैरजबाबदारपणामुळे तालुक्यातील बहुतांश शासकीय कामे प्रलंबित आहेत काही प्रकरणे हि मागील कित्येक महिन्यापासून ते वर्षापर्यंत प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे, भूमी अभिलेख अधिकारी पाल मॅडम ह्या कार्यालयात काम करीत असताना दरवाजा बंद करून असतात, व नागरिकांना स्वतः कामात व्यस्त असल्याचे दाखवतात जेव्हा नागरिक कामाच विचारतात तेव्हा तुम्ही फाइल केव्हा दिली असा प्रश्न स्वतः पाल मॅडम नागरिकांना करतात.
त्यामुळे कामासाठी आलेले नागरिक उलटे पायी घरी परत येतात, आखीव पत्रिका, फेरफार व सातबारा फेरफार व घरकुलासाठी आखीव पत्रिका दुरुस्ती व अनेक समस्यांचे समाधान न झाल्यामुळे सावली तालुक्यातील जनतेमध्ये संबधित भूमी अभिलेख अधिकारी पाल मॅडम यांच्या विषयी रोष निर्माण झाल्याचे वातावरण निर्माण झाले.
करिता सदर संबधित भूमी अभिलेख अधिकारी यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात यावी यासाठी तहसीलदार, उप-अधीक्षक भूमी अभिलेख यांच्यामार्फत जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे तसेच लोकप्रतिनिधी व राज्याचे विरोधि पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे सुद्धा निवेदन देण्यात आले आहे आता प्रशासन भूमी अभिलेख महिला कर्मचारी पाल यांच्यावर काय कार्यवाही करते याकडे सावली तालुक्यातील जनतेचे लक्ष्य वेधले आहे.
निवेदन देताना सावली नगरपंचायतीचे पाणीपुरवठा स्वच्छता व आरोग्य सभापती मा.प्रितम गेडाम, नगरसेवक मा.नितेश रस्से, मा.गुणवंत सुरमवार,नगरसेवीका सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,सौ.अंजली देवगडे,माजी उपनगराध्यक्ष मा.भोगेश्वर मोहुर्ले,माजी नगरसेवक मा.चंद्रकांत संतोषवार,सामाजिक कार्यकर्ते मा.आकाश खोब्रागडे,मा.निखिल दुधे,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.कुणाल मालवनकर आदी उपस्थित होते.