विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे भारपायली येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,२१ मे २०२४ तालुक्यातील मौजा.भारपायली येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे माजी सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार व भारपायली येथील जेष्ठ नागरिक मा.आनंद खोब्रागडे यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
मौजा.भारपायली येथील मोनिका सुनील दंडिकवार या महिलेची वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले, घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना भारपायली येथील युवा काँग्रेस कार्यकर्ता मा.श्रीकांत बहिरवार,चारगावचे उपसरपंच मा.राजू वलके,मा.सनतकुमार बोरकर,मा.दिनेश नर्मलवार, मा.पंकज आदरलावार आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.