रिपाई तर्फे माही हंसराज उराडे हिचा सत्कार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : नागपूर बोर्ड नागपूर १२ विच्या परिक्षेत शिवकृपा विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथील विज्ञान शाखेची मुलगी माही हंसराज उराडे हिने 93 % गुण प्राप्त करून गडचिरोली जिल्हयातुन पहिली आल्याबद्दल...
रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली माही हंसराज उराडे रा.माडेतुकुम ता.जि.गडचिरोली येथे त्यांच्या घरी जावून हिचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
हंसराज उराडे हे सामाजीक कार्यकर्ते व सामान्य शेतकरी आई अंगणवाडी सेविका यांचेही कौतुक करून माहि हि नागपूर बोर्डात अनु.जाती मधुन पहिली आल्याबद्दल तिला तिच्या उच्चशिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात.
सत्कार करताना रिपाईचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,रिपाईचे जेष्ठ नेते ॲड.शांताराम उंदिरवाडे,सामाजीक कार्यकर्ते, भोजराज कान्हेकर,चक्रधर मेश्राम,शरद लोणारे, सुरेश कन्नमवार,विक्की धाईत आदिची उपस्थिती होती.