दारूबंदी जिल्ह्यात बिअर च्या बाटलाचा खचाखच.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली जिल्हयात दारूबंदी असुन सुद्धा बिअर च्या बाटला येतता कुठुन हे एक पोलीसांना आव्हानच आहे. बि अरच्या बाटला चोरट्या मार्गाने आणणे कठीण काम आहे . एकतर बॉटला मोठ्या असतात . आणुन त्या फ्रिसमधे थंड कराव्या लागतात एवढे कठीण काम अवैध बिअर विक्रेत्यांना करावे लागतात.
यावरून गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदिपार करून चोरट्या मार्गाने इंग्लीस व देशी दारू किती प्रमाणात येत असेल यांची कल्पना न केलेली बरी.निवडणुकीच्या काळात पोलीसाची नाकेबंदी होती तरीही एवढा दारुचा पुरवठा गडचिरोली शहरात झाला. बिअर शौकीन व दारू विक्रेते मात्र बिअर व इंग्लीस दारुच्या रिकाम्या बाटला पोटेगांव रोड लगत शहराच्या अवध्या अर्धा कि.मी. अंतरावर पोत्यासवरी रिकाम्या बाटला खचाखच फेकल्या आहेत.
एवढा पुरवठा जर बिअर च्या बाटलाचा होत असेल तर इंग्लीस व देशी दारूचा शहरात महापुरच असावा आठवळी बाजार लगत दारू विक्रेत्याचे अड्डे बिअर बॉर सारखे चालतांना बघायला मिळतात परंतु पोलीस विभागाचे याकडे दुर्लक्ष असुन तेरी भी चुप मेरी भी,असा प्रकार सुरु असुन यात दारू विक्रेत्याचे व पोलीसांचे चांगभले होतांना दिसते.सदर बाबीकडे जिल्हा पोलीस अधिक्षक लक्ष देतील काय.असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.