श्री.अमरदीप लोखंडे यांच्या लेखणीतून...
!! अवकाळी !!
एस.के.24 तास दिनांक,१३/०५/२४
सकाळी सकाळी
आला अवकाळी
सुरू धावपळी
कास्तकाराच्या...
कोणाचा धान कापला
वाऱ्याने उभा झोपला
असा निसर्ग कोपला
शेतकऱ्याच्या जीवावर...
कोणाचा झाला चुरून
आंगणात पोते भरून
कोणी हार्वेस्टर फिरवून
ओला शेकती उन्हात...
वेळ,काळ नाही याला
पाणी,गारपीट पळण्याला
ऊकुळ झोप डोळ्याला
ढग करण्या जातो धानाचा...
पावसाळी नाही धळ
उन्हाळी अवकाळीची झळ
रातभर फेरू फेरू कळ
कधी उठून बसतो...
मन चिंतेचे माहेर
नाही फिरत बाहेर (यात्रा)
साऱ्या कुटुंबाचा भार
उचलून जगतो...
कर्ज सोसायटी,बँकेचे
कमी चुकारे धानाचे
दोष पाखर बोलीचे
काढून व्यापारी...
जमा खर्च सालाचा
जीव गहाण मोलाचा
शब्द अंतिम बोलाचा
बोलून फेस टाकतो
बोलून केस टाकतो...
श्री.अमरदीप प्रल्हाद लोखंडे लेखक,कवी,उपसंपादक - एस.के.24 तास मु.पो.अ-हेरनवरगाव ता.ब्रम्हपुरी जिल्हा.चंद्रपुर मो.नं. ८३०८००५८६८