रविंद्र कंकलवार यांना सन्मानचिन्ह देतांना पोलीस अधीक्षक,निलोत्पल |
रविंद्र कंकलवार यांना महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान.
एस.के.24 तास
गडचिरोली : पोलीस सेवेत महत्वाचे समजले जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दि.24 एप्रिल रोजी जाहीर केले.दरवर्षी 01 मे रोजी पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रदान करण्यात येतो.
यामध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह 128 पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या यादीमध्ये चांदापूर चे सुपुत्र असलेले,रविंद्र कंकलवार यांचे सुद्धा नाव आहे.
रविंद्र कंकलवार हे सन 2013 मध्ये गडचिरोली पोलीस दलात भरती झाले.
2014 मध्ये पोलीस दलातील मूलभूत प्रशिक्षण घेऊन ते उप पोलीस स्टेशन रेपनपल्ली,छत्तीसगड सीमेवर असलेले अतिदुर्गम उप पोलीस स्टेशन दामरंचा या ठिकाणी आपले कर्तव्य बजावलेले आहेत.
सन 2018 मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या नागरी कृती शाखेत त्यांची बदली झाली.
या शाखेचा मूळ उद्देश हा पोलीस-जनता यांच्यात चांगले संबंध तयार करणे,माओच्या विचारसरणी पासून गडचिरोली च्या अतिदुर्गम भागातील जनतेला दूर ठेऊन त्यांना शासकीय योजणांचा लाभ मिळवून देणे जेणेकरून नागरिकांना शासनाप्रति विश्वास निर्माण होऊन लोकशाही मार्गाने गडचिरोली चा विकास होईल.
नागरी कृती शाखेत काम करतांना विविध उपक्रम राबवून जनतेला मूळ प्रवाहात आणण्याचे काम केल्यामुळे त्यांना पोलीस अधीक्षक,नीलोत्पल यांच्या हस्ते त्यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यापूर्वी सुद्धा त्यांना बेस्ट पॉलिसिग चा अवॉर्ड मिळालेला आहे.
कुरमार / धनगर समाजातील पहिले पोलीस सन्मानचिन्ह मिळविणारे आहेत ही कौतुकास्पद आहे.
पोलीस महासंचालक,पोलीस अधीक्षक,सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच कुरमार / धनगर समाज तर्फे सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून यापूढे सुद्धा त्यांच्या हातून चांगले कार्य घडावे अश्या शुभेच्छा देण्यात आले.