6 लाख रूपयाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्याने केले. गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण.

6 लाख रूपयाचे बक्षिस असलेल्या जहाल माओवाद्याने केले.  गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण.


एस.के.24 तास


 गडचिरोली : शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे.त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण ६६२ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. 


आज २८ मे २०२४ रोजी एकुण ०६ लाख रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी नामे गणेश गट्टा पुनेम वय,३५ वर्ष रा.बेच्चापाल, तह.भैरमगड,जि.बिजापूर (छ.ग.) याने सीआरपीएफचे पोलीस उप-महानिरीक्षक जगदीश मीणा यांच्या समोर आत्मसमर्पण केले त्यानंतर त्यांनी त्याचे हस्तांतरण गडचिरोली पोलीस दलाकडे केले.


आत्मसमर्पीत जहाल माओवादी सदस्याबाबत माहिती –
गणेश गट्टा पुनेम
दलममधील कार्यकाळ –
– सन २०१७ मध्ये सप्लाय टिम (भैरमगड एरीया) दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन माहे जानेवारी २०१८ पर्यंत कार्यरत.
– सन २०१८ मध्ये सप्लाय टिममध्ये उप-कमांडर पदावर बढती.
– सन २०१८ पासुन आतापर्यंत सप्लाय टिम उप-कमांडर (भैरमगड एरीया) पदावर कार्यरत.

कार्यकाळात केलेले गुन्हे –
चकमक- ०२
– सन २०१७ मध्ये मौजा मिरतूर, जि. बिजापूर (छ.ग.) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.
– सन २०२२ मध्ये मौजा तिम्मेनार जि. बिजापूर (छ.ग.) जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग.

आत्मसमर्पीत होण्याची कारणे –
– माओवादी दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून, स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही.
– दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे लागतात. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही.
– वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
– दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही वैवाहीक स्वतंत्र आयुष्य जगता येत नाही.
– गडचिरोली पोलीस दलाच्या आक्रमक माओवादविरोधी अभियानामुळे माओवादी कारवायांचे कंबरडे मोडले आहे.
– वरीष्ठ माओवादी नेते पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून आमच्याच निष्पाप बांधवांना ठार मारायला सांगतात.

शासनाने जाहिर केलेले बक्षीस –
– महाराष्ट्र शासनाने गणेश गट्टा पुनेम याचेवर ०६ लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
– आत्मसमर्पणानंतर शासनाकडून मिळणारे बक्षीस.
– आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन गणेश गट्टा पुनेम याला एकुण ५ लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन २०२२ ते २०२४ सालामध्ये आतापर्यंत एकुण १४ जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई सी.आर.पी.एफ.चे मा.पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) जगदीश मीणा व गडचिरोली जिल्ह्राचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली उप-कमांडण्ट सीआरपीएफ नितिन कुमार यांच्या नेतृत्वाखाली आर.एफ.टी (रेंज फिल्ड टीम) च्या इंट सेल पथकाकडून करण्यात आली.

यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन,जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !