58 व्या वर्षी आजीबाई झाल्या बारावी ची परीक्षा उत्तीर्ण.

58 व्या वर्षी आजीबाई झाल्या बारावी ची परीक्षा उत्तीर्ण.


एस.के.24 तास


पुणे : मावळ शिक्षण हे असे बाळकडू आहे ज्याला वयाची मर्यादा नसते. शिक्षणाची आवड कुणाला शांत बसू देत नाही,अनेकांना परिस्थितीमुळे किंवा घराच्या जबाबदारीमुळे शिक्षण घेता येत नाही. मात्र या सर्वांना मात देत मावळ तालुक्यातील एका 58 वर्षीय आजी अपवाद ठरल्यात.तब्बल 42 वर्षानंतर आजीने बारावीची परीक्षा दिली आणि त्यांनी घवघवीत यश मिळवले, त्यांच्या या कामगिरीचे संपूर्ण मावळ तालुक्यातून कौतुक होत आहे.


अंगणवाडी सेविका ते विद्यार्थी प्रवास : - 


बनताबाई पुताजी काजळे/चोपडे गेल्या 25 वर्षांपासून नायगाव इथल्या अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतायत. गरीबीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही यांची खंत मनात असल्याने त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले.मुलांचे शिक्षण,घरची जबाबदारी, संसारांचा गाढा ओढताना त्या अंगणवाडी सेविका म्हणूनही कार्यरत होत्या.परिस्थितीमुळे बनताबाई यांचे 42 वर्षापूर्वी शिक्षण अर्ध्यावरच सुटले,मात्र अंगणवाडी मदतनीस म्‍हणून काम करणार्‍या बनताबाई यांनी बारावीची परीक्षा देण्‍याचा निर्धार केला आणि त्यांचा विद्यार्थी म्हणून एक नवा प्रवास सुरु झाला.


17 नंबरचा फॉर्म भरला : - 


अर्धवट शिक्षण राहिलेल्या किंवा काही कारणास्तव पुन्हा शिक्षण घेवू इच्छिणाऱ्यांसाठी सरकारने बाहेरुन परीक्षा देण्याची मुदतवाढ दिले. याचाच फायदा घेत बनताबाई यांनी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. घरातली कामे तसेच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत असताना कामाच्या जबाबदाऱ्या यांचा ताळमेळ बसवत त्यांनी अभ्यासासाठी वेळ काढायला सुरुवात केली.


परीक्षा हॉलमध्ये शिरताच कौतुकाचा वर्षाव : - 


58 वर्षीय आजींना जेव्हा प्रत्यक्षात परीक्षा हॉलवर जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांना किंचितशी धाकधूक वाटली पण आजीबाई वर्गात आल्या तसे सर्वांनीच त्यांचे कौतुक केले.आजीच्या चिकाटी आणि जिद्दीला पाहून साऱ्यानांच नवल वाटू लागले.


58 वर्षीय आजींना मिळाले 48 टक्के : - 


मार्चमध्ये आजींनी बारावीची परीक्षा दिली आणि बुधवारी त्यांचा निकाल जाहीर झाला.आजीबाईंनी परीक्षेत तब्बल 48 % इतके गुण संपादित केलेत आजीबाईनी मेहनतीने परीक्षा दिली आणि त्यात त्यांनी घवघवीत यशही मिळवून दाखवले. समाजात एका नवा आदर्श निर्माण झाला.शिक्षणाची आवड माणसाला शांत बसून देत ते खरंच आहे.याचे उदाहरण म्हणजे बनताबाई आजी, त्यांचा मेहनतीला सलाम...

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !