लेख... सुरेश कन्नमवार यांच्या लेखणीतून... मासिक पाळी एक समज गैरसमज. ◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆ 28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त...


लेख...

सुरेश कन्नमवार यांच्या लेखणीतून...   


मासिक पाळी एक समज गैरसमज.  ◆●◆●◆●◆●◆◆●◆●◆●◆●◆   28 मे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त...


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक एस.के.24 तास


मासिक पाळी- अपवित्र कशी.?                          ती / तो.आणि तिची मासिक पाळी.          सगळ्या विश्वाची निर्मिती कुणी केली.?          

तर उत्तर येत देवाने...!   

मग पुरुष कुणी निर्माण केले.? देवाने...!            स्त्रीया कुणी निर्माण केल्या.? देवाने...!                मग स्त्री ची मासिक पाळी कुणी निर्माण केली.? 

देवानेच ना.?

जर देवाला मासिक पाळी आवडत नाही तर      मग त्याने ती स्त्रीला दिलीच कशाला.?        मासिक पाळी म्हणजे काय.?                 गर्भधारणा न झाल्याने शरीरातून बाहेर टाकली जाणारी गर्भाची अंतत्वचा...!                गर्भधारणा झाली नाही तर दर महिन्याला 5 दिवस ही क्रिया घडते की जिला आपन मासिक पाळी म्हणतो...!

आता मासिक पाळीत जे रक्त बाहेर पडतं ते अशुद्ध असतं असा एक गैरसमज आहे किंवा या काळात स्त्रीया निगेटिव्ह एनर्जी बाहेर टाकत असतात असा एक फालतू गैरसमज आहे...     खर तर दर महिन्याला गर्भाशय तयार होतं आणि गर्भधारणा न झाल्याने ते बाहेर टाकलं जातं...   मग ते अशुद्ध कसे असेल.?


उलट ज्या ठिकाणी बाळाचं 9 महीने 9 दिवस संगोपन होणारे त्या जागी शरीरातील चांगलच रक्त असेल ना..? की अशुद्ध असेल..?


झाडाला फूल येतं मग त्या फुलाच फळ होतं. आपन झाडाची फुले देवाला घालतो.            कारण देवाला फुले आवडतात.                   बाईला मासिक पाळी येते.आणि म्हणून गर्भधारणा होते.म्हणजे मासिक पाळी जर " फूल " असेल तर गर्भधारणा हे " फळ " झालं..!


देवाला झाडाच फूल चालतं मग मासिक पाळी का चालत नाही..? मासिक पाळी आलेल्या बाईचा साधा स्पर्श चालतनाही.? कधी कधी ती घरात धार्मिक कार्यक्रम आहे म्हणून गोळ्या खाऊन पाळी पुढे ढकलते.की जे सरळ-सरळ निसर्गाच्या विरोधात जाणं आहे.आणि याचा त्रास तिलाच होतो.मुळात प्रॉब्लेम जो आहे ना तो पुरुषी मानसिकतेत आहे.


तिच्यावर हक्क गाजवला पाहिजे या पुरुषी अहंकाराचा आहे आणि त्या पेक्षा सर्वात जास्त स्वतः स्त्रीच्या मानसिक गुलामगिरित आहे.या गोष्टींकडे आपन कधी उघड्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलेलच नाहिये...!


मासिक पाळी ही बाईची कमजोरी नसून निसर्गाने बाईला दिलेली ही जास्तीची शक्ती आहे की जी तीला आई बनण्याचे सुख बहाल करते.आणि कोण आहेत ही फालतू जनावरं की जी सांगतात ' बाईला मासिक पाळीत मंदिरात प्रवेश नाही म्हणून.?


" बाईच गर्भाशय म्हणजे वाटलं काय तुम्हाला.? कोनीही जनावरं की जी सांगतात 10-10 मुलं जन्माला घाला..!


अरे एका बाळंतपनात बाईची काय हालत होते ना ते आधी " तुमच्या आईला " जाऊन विचारा.पोटाच्या बेंबी पासून ते छाती पर्यत 9 महीने 9 दिवस बाईने आणखी एक जीव वाढवायचा.त्याला जन्म द्यायचा.त्याचे संगोपन करायचं.आणि एवढं सगळं करुण मुलाच्या नावात आईचा साधा उल्लेखही नाही..! मुळात गडबड आहे ना ती इथल्या सडक्या मेंदूत आहे..!


प्रश्न आहे तो बाईला केवळ भोगवस्तु म्हणून पाहणाऱ्या इथल्या घाणेरड्या पुरुषी मानसिकतेचा.!

आणि जास्त गडबड आहे ती " तिच्यातच " आहे,कारण ती स्वतालाच समजून घेत नाही.ती कुटुंबाच्या भल्यातच इतकी गुंगते की तीला या गोष्टींवर साधा विचार करायलाही फुरसत नाही हे सगळं चालु आहे. याचं कारण " ती " गप्प आहे.ती विद्रोह करत नाही.ती मुकाट्यांन सहन करते...


गरज आहे तीला विद्रोह करण्याची इथल्या दांभिक वास्तवा विरुद्ध इथल्या सडक्या पुरुषी मानसिकते विरुद्ध इथल्या धर्माच्या अवडंबा विरुद्ध आणि गरज आहे त्याला तीला समजून घेण्याची.तिच्या मासिक पाळीला समजून घेण्याची.तिच्या भाव भावनांना समजून घेण्याचीआणि या विद्रोहात तितक्याच हळुवारपने " तीला " मदत करण्याची...!


मित्रांनो,विचार तर करा...?


मासिक पाळी ला विटाळ समजणारे लोक स्वताच्या मुलीला मासिक पाळी येत नसेल तर लगेच डॉ.कडे जातात.मुलाच लग्न करताना मासिक पाळी न येणा-या मुलीला आपली सुन म्हणुन स्वीकारतील का ? नाही ना ?


शारीरिक गरजा,व्यथा,काळजी,मानसिक रोग, आजार,सेक्स,पाळी,अनैतिक संबंध,वेश्या, स्वतःच शरीर अशे कित्येक विषय आहेत त्याबद्दल आपण खुलेपणाने बोलत नाही मित्र आपापसात बोलतात आणि मैत्रीणिही पण त्याबद्दल एक डाऊट फुल नजरेने बघितलं जात आणि बोललही जात तितकी इन डिटेल चर्चा आपण त्यावर कधी करत नाही नवरा बायको ही नाही,गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ही नाही,आई आणि मुलगी ही नाही आणि आई आणि मुलगा तर दूरची गोष्ट...


खरतरं आपल्या सर्वांना लहान पणा पासूनचं " स्त्रीच्या शरीराबद्दल " कमी माहिती मिळत आलीये आपल्या घरातून म्हणजे पाळीचा विषय असला तर आई आणि मुलगी आपापसांत चर्चा करणार पॅड लपून ठेवणार बाबांना विचारलं तर नेहेमीप्रमाणे,डोळे वटारून " आपापलं काम कर " अशी ताकीद मिळणार.म्हणजे सगळंच गूढ सेम गोष्ट स्त्रियांच्या अंतर्वस्त्राबाबतही जेवढ्या नॉर्मल पणे आपले कपडे स्पष्ट बोलायचं झालं तर " चड्ड्या " दोरीवर वाळत घातले जातात तेव्हड्याच नॉर्मलपणे स्त्रियांचे कपडे का नाही वाळत घालत आपण.?


यात एवढं लपवण्या सारखं काय.? जसा पुरुष तशी स्त्री जसं आपण आतमध्ये बनियन आणि अंडरवेअर घालतो अगदी सेम त्या स्लिप,ब्रा आणि अंडरवेअर घालतात.मग यात लपवायच ते काय.? या सगळ्या गोष्टी आपल्या लहान पणा पासून लपवून ठेवल्याने नंतर आपलं त्यांच्या बद्दलच curiosity वाढत जाते.जी नंतर " हवस " मध्ये रूपांतरित होते.याला आपला अख्खा समाज जबाबदार आहे.कारण आपण त्याबद्दल कधी चर्चा नाही केली.


तशीच गोष्ट पाळी बाबत प्रत्येक बाईला,मुलीला पाळी येते.त्यात वेगळ काय...? तुमच्या बोटांमधून जर कट लागून रक्त निघायला लागलं तर अख्खा घर तुम्ही डोक्यावर घेता तर 5 - 6 दिवस अवघ रक्ताळलेलं शरीर घेऊन ती जेव्हा फिरत असते तेव्हा काय हाल होत असेल तिचे शहरात याबद्दल जागरूकता पसरत चाललीये.एक बहीण आपल्या भावाला सांगते याबद्दल.एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंड ला सांगते पाळी आली की,मैत्रीण ही सांगते मित्राला.पण ग्रामीण / खेड्यातल्या भागात.? जी स्त्री महिनाभर घर सांभाळते तिला जेव्हा पाळी येते त्या दिवसांत घरात कुणी विचारत ही नाही.


हे मी स्वतःच्या डोळ्यांनी गावी पाहिलंआणि जेव्हा आईला विचारलं तर स्वतः आई " तू तुझं तुझं काम कर " असं म्हणाली होती.म्हणजे कमीत कमी आपल्या आईने तरी याबद्दल खुलासा करावा असं मला तेव्हा वाटलं होतं.


गावी आजही कापडाचा वापर सर्रास केला जातो.. पॅड लावला तर त्याची विल्हेवाट नीट लावली जात नाही.आणि शहरांतही कितीही मॉडर्न लोकं झाले तरीही गणपती,नवरात्र, सणांमध्ये जर तिला पाळी आली की वाळीत / घराबाहेर ठेवले जाते बाहेर जायला मज्जाव असतो...ग्रहण असलं की केसं न धुणाऱ्या मुलीही आहेत या जगात.


लोकांना कोण सांगणार की Periods हा प्रॉब्लेम नसतो तर तो न येणं हा प्रॉब्लेम असतो.तिची पाळी तुमच्या सणांमध्ये नाही तर तुमचे सण तिच्या पाळी मध्ये आलेत.कित्येक शहरी आणि जॉब करणाऱ्या स्त्रियांना पाळी पुढे ढकलताना गोळ्या घेताना पाहिलंय आणि गर्भाशयाच्या ऑपरेशन नंतर तिला पाळी नाही येणार म्हणून लोकांना खुष होताना पाहिलंय. इतिहास साक्षी आहे स्त्रीला.गुलामीत ढकलायला स्त्री स्वतः जबाबदार होती.आणि त्या परतंत्र्यातून बाहेर काढायला सुद्धा स्त्रीलाच पुढाकार घ्यावा लागलाय.


पाळी ही निसर्गाने (ज्याने सृष्टी निर्माण केली असे तुम्ही मानता तो) स्त्रीला दिलेली नैसर्गिक गोष्ट आहे.त्यामुळे पाळी आल्यावर तो निसर्ग (तो देव,अल्लाह,येशू,इ.) कशाला तुम्हाला त्यापासून दूर ठेवेल.? ही सगळी नियमं धूर्त पुरुष प्रधान संस्कृतीने निर्माण केलीत कारण त्यांना genuinely स्त्री पुढे गेलेली कधीच आवडत नाही.


एवढं सगळं साधं आणि सोप्पं आहे.त्यामुळे आज पासून बिनधास्त त्यावर चर्चा करायला शिका आणि  अभिमानाने सांगा " मला पाळी आली." 



      

            सुरेश सुखदेव.कन्नमवार                 लेखक तथा मुख्य संपादक - एस.के.24 तास        मु.कोंडेखल पो.केरोडा ता.सावली जिल्हा.चंद्रपूर   मो.नं : - 8805113505



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !