सामाजिक कार्यकर्ते,प्रफुल निरुडवार यांच्या प्रयत्ना ला यश ; एस.के.24 तास ला प्रकाशित झाली होती बातमी.
★ फुटलेल्या पाईप लाईनच्या कामाला सुरुवात ; गावकऱ्यांनी चकपीरंजी ग्रा.पं.चे मानले आभार.
एस.के.24 तास
सावली : चकपिरंजी वार्ड क्रमांक 1 रोशन धनराज तिवाडे यांच्या घरासमोर मागील चार महिन्या पासून पाईपलाईन फुटलेली होती.ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या वारंवार लक्षात आणून देऊन सुद्धा याकडे दुर्लक्ष करित होते.
रोशन तिवाडे याचं घराचं काम चालू असल्याने विटा भरलेली ट्रॅक्टर आणने कठीण होती.त्यामुळे खूप मोठा त्रास सहन कराव लागत होता.परंतु सामाजिक कार्यकर्ते,प्रफुल निरुडवार यांच्या लक्षात आणून दिली.असता त्यांनी ग्रामपंचायतला दोन दिवसात समस्या दूर न झाल्यास आंदोलनाचा इशारा देऊन एस.के.24 तास ला बातमी दिली होती.बातमी झळकताच एका दिवसात कामाला सुरुवात झालेली आहे.
त्याबद्दल सामाजिक युवा कार्यकर्ते,प्रफुल निरुडवार आणि गावातील नागरिक यांनी चकपीरंजी ग्रामपंचायत कार्यालयाचे आभार व्यक्त केलेले आहे.