महामार्गांवरील दुर्लक्षीत " गटरलाईन " केव्हा होणार साफ ? ★ 2022 मध्ये 800 घरात घुसले होते.घाण पाणी. वार्ताविशेष : - महेश पानसे

महामार्गांवरील दुर्लक्षीत " गटरलाईन " केव्हा होणार साफ ?


2022 मध्ये 800 घरात घुसले होते.घाण पाणी.


वार्ताविशेष : - महेश पानसे


राजेंद्र वाढई - उपसंपादक एस.के.24 तास


मुल : पावसाळा तोंडावर आहे. यंदा मान्सून लवकरच बरसणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेता मूल नगरपरिषद प्रशासन मान्सून पूर्व तयारीला लागले असले तरी यंदा मात्र शहरातून धावणाऱ्या राष्ट्रीय महामार्गा सोबत धावणाऱ्या गटर लाईन ची सफाई हा विषय तेवढाच महत्वाचा व पावसाळ्यातील अडगळ थाबविणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.


गत अनेक वर्षां पासून सफाई साठी तरसलेल्या मुल शहरातुन धावणाऱ्या चंद्रपूर- गडचिरोली महामार्गाचे दोन्ही कडेला बांधण्यात आलेल्या या  मोठया गटर लाईनला आजवर दुर्लक्षीत ठेवण्यात आले आहे.


व याचा मोठा फटका अनेकदा निवासी घरांना बसला आहे.मुल शहरातून महामार्गा सोबत धावणारी ही गटर लाईन अंदाजे एक चतुर्थांस माती व केर कचऱ्याने भरलेली आढळते.या गटर लाईन मधून संपुर्ण शहरातील सांडपाण्याचा निचरा तलावांमध्ये होतो.पावसाळ्यातील शहराच्या चहूबाजूने येणाऱ्या पावसाच्या पाण्याला सामावून घेण्याचे महत्वाचे काम ही गटरलाईन करते.


आधीच ही गटरलाईन पावसाचे पाणी वाहून नेण्यास तांत्रिकदृष्टया सक्षम नसल्याची ओरड आहे.अशा स्थितीत गटरलाईन तुडूंब भरून जोडलेल्या नाल्यांचे पाणी थोपून शहरातील मोठया परिसरात पसरण्याची भिती निर्माण होत असते.


 2020 - 2021 मध्ये शहरातील शेकडो घरांमध्ये घाण पाणी घुसून जिवघेणी स्थिती निर्माण झाली होती.अखेर शहराबाहेरून वन विकास महामंडळाचे क्षेत्रातून भरमसाठ अतिरीक्त पाणी अर्धा कि.मी.नाला काढून परस्पर बाहेर काढावे लागले होते.


मुल शहरातून अंदाजे एक ते दिड कि.मी.लांबींची ही गटर लाईन असून यावर संपुर्ण अतिक़मण झाले आहे.यावर हॉटेल,खानावळ,हार्डवेअर, फर्नीचर,वर्क्स,पानठेले,बियरबार बसलेले असून दररोज मोठया प़माणात  केरकचरा या गटरलाईन मध्ये टाकला जातो.


तसेच महामागांवरील बांधकामासाठी वापरण्यात येणार रेती,माती,विटांचे तुकडे या गटरलाईन मध्येच साठले जात आहे. अशा स्थितीत पावसाळ्यापूर्वी  या गटरलाईनची सफाई मोहीम न.प.ने राबविली नाही तर पावसाळ्यात पाणी चौफेर पसरून जिवघेणी स्थिती निर्माण होईल हे निश्चित असल्याची  भिती व्यक्त होताना दिसते. 


न.प.मुल चा आरोग्य व  स्वच्छता विभाग मान्सूनपूर्व कामे नेटाने करीत असला तरी यंदा मात्रं या गटर लाईन ची सफाई अगत्याने करावी लागणार आहे.मुल न.प.प्रशासक व न.प.मुख्याधिकारी यांनी हा विषय गंभिरतेने घेतल्यास येणारा पावसाळा शहर वासियांना अडचणीत टाकणारा ठरणार नाही असे जाणकारांचे मत आहे.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !