बार्सेवाडा जळीत हत्याकांड प्रकरण.भाग क्र.2 ★ एटापल्ली पोलिसाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात.पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष देण्याची भ्रष्टाचार निर्मुलन समितीची मागणी.

बार्सेवाडा जळीत हत्याकांड प्रकरण.भाग क्र.2


एटापल्ली पोलिसाचा तपास संशयाच्या भोवऱ्यात.पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष देण्याची भ्रष्टाचार निर्मुलन समितीची मागणी. 


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली 


एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील परसेवाडा जळीत हत्याकांड प्रकरणी बंडु तिलामी यांची मुलगी कुपोषणाने बळी पडून मृत्यू झाला व त्याच्याच पत्नीचा कुपोषणाने गर्भपात झाला गर्भातील मुलगा मरण पावला. 


या दोघांनीही सर्वप्रथम पुजाऱ्या कडून इलाज केला होता.नंतर त्यांनी आपल्या बिमार मुलीला ग्रामीण रुग्णालय एटापल्ली व उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे १५ दिवस भरती केले होते.मुलीला निमोंनिया,रक्ताची कमतरता होती म्हणुन तीला रक्त देण्यात आले. त्यातच कुपोषण भुकबळी प्रकार होताच बंडुने आपल्या मुलीला पुजाऱ्यांना दाखविले व साडेतिन वर्षाची मुलगी मरण पावली.


बंडु तिलामी यांनी माझे मुले पुजाऱ्या मुळेच मेलेत अशा प्रकारचा संशय घेऊन बार्सेवाडा येथे दि.१ मे सायंकाळी बैठक बोलावून पुजारी जननी देवाजी तेलामी वय,52 वर्ष देवू कटिया आतलामी वय,57 वर्ष याना बैठकीत बोलावून या दोघांना कमेटीतील लोकांनी मारहान केल्यामुळे जननीचा भाऊ सादु मासा मोहोदो वय,47 वर्ष वालसामुडी व जननीचा मुलगा मनोज पुजा-यांना मारू नका म्हणुन मध्यस्ती करीत असताना बैठकीतील लोकांना या दोघांना मारहान केली.


आपला जिव मुठीत धरून दोघेही वालसामुडी पळाले. जननी मृत्युकीचा भाऊ सादु यांनी दि.२ मे ला पोलीस स्टेशन एटापल्ली येथे फिर्याद नोंदविल्यामुळे सदर बिंग फुटले व गाव पाटिल (पोलीस पाटिल नव्हे) लालु मडावी बार्सेवाडा यांच्या सांगण्यावरून एटापल्ली पोलीसांनी तब्बल १६ आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून त्यांचेवर कलम 302,307,201,143,149 IPC अमानुष कृत्य बळी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. 


एवढ्याच चौकशीत एटापल्ली पोलीस थांबले.महत्वाची बाब अशी की अंधश्रद्धा पसरविणारी दोन पुजारी हे तर दोषी आहेतच परंतु त्यांना बार्सेवाडा गावापासुन जंगलात 1 कि.मी. अंतरावरील जंगलात दोन्ही नाल्याच्या दरीत जिवंतपणी रॉकेल टाकुन जाळून टाकणारे 16 आरोपी पकडल्या गेले.हे एटापल्ली पोलीसाचे कार्य अभिनंदनास पात्र आहेत. 


परंतु बैठक कुणी बोलवायला सांगीतली बैठक कुणी बोलावली.पुजाऱ्यांना जिवंत जाळण्याचा आदेश कुणी दिला ? पळून जाणाऱ्या फिर्यादिनी जाळतांना पाहिले असावे ? डॉक्टरांचा रिपोर्ट कुपोषण ' भुकबळीआदि प्रश्नाच्या उखल एटापल्ली पोलीसांनी तपासात न घेता गाव पाटल्याच्या सांगण्यावरून आरोपींना अटक केली. नव्हे धातूरमातूर चौकशी केली. 


अंधश्रद्धा निर्मुलन कायद्यानुसार जादूटोणा करणाऱ्यावर बंदी आहेस.आदिवासी बाहुल भागातील गाव पाटिल असो किंवा पोलीस पाटिल असोत यांनी पोलीसांना सहकार्य करून परंपरा जोपासली म्हणायचे की अंधश्रद्धा म्हणायची अशा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या  बार्सेवाडा येथे जावून प्रत्यक्ष पाहणी करणारे व माहिती घेणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर गडचिरोली व गोपाल रायपूरे चंद्रपूर यांनी पुर्णर चौकशीची मागणी केली आहे.


बार्सेवाडा जळीत हत्याकांड प्रकरणी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना सदर घटनेबाबत पत्रकारांनी विचारपुस केली असता बैठकीत हजर असणाऱ्यांना चौकशी करून पकडण्यात येहिल असे सांगीतले होते.ते अगदी फोल ठरले. 


हि अंधश्रद्धा कि परंपरा जे आदिवासी आपल्या कुटुंबातील बिमार पडलेल्या लोकांना सर्वप्रथम गाव पुजाऱ्याकडे दाखवितात यात दवाखाण्याचा विचारस करीत नाही.हि परंपरा व अंधश्रद्धा नष्ट करायची असेल तरच पुढची पिढी अश्या अंधश्रद्धा मार्गाने जाणार नाही तेव्हा सदर प्रकरणात पोलीस अधीक्षक साहेबांनी लक्ष दयावे व सदर प्रकरणाची पुनर चौकशी करावी अशी मागणी.


 रिपब्लिकन पार्टी चे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर व रिपाईचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,गोपाल रायपूरे यांनी शासनाकडे केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !