कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत नवेझरी कुलूप बंद ग्रामसेवक येतो 15 दिवसातून 2 वेळा गावकऱ्याची तक्रार.

कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत नवेझरी कुलूप बंद ग्रामसेवक येतो 15 दिवसातून 2 वेळा गावकऱ्याची तक्रार.


मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक


कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत नवेझरी ग्रामपंचायतीला वाली कोण म्हणायची पाळी आली आहे.सदर ग्रामपंचायत नेहमीच कुलुप बंद दरवाजा दिसतो.कारण ना ग्रामसेवक ना चपराशी.एस.के.24 तास चे प्रतिनिधी नी गावकऱ्याचा प्रतिक्रिया घेतल्या असता. 



महिला ग्रामसेवक असुन ती पंधरा दिवसातून एकदाच येतो.असे व्हिडिओ द्वारा सांगीतले.पावसाला 10 दिवसा नंतर सुरुवात होहिल तरी ही गावातील नाल्या उपसा नाही.गावात घाणीचे साम्राज पसरले आहे.विकासाची कोणतेच कामे ग्रामसेवक व सरपंच कडून होत नाही.सदर गाव अतिदुर्गम असुन या ग्रामपंचायती कडे बि.डि.ओ.कुरखेडा यांचे दुर्लक्ष आहे.शेतकऱ्याचे कामे विद्यार्थाचे कामे प्रलंबित आहेत.


ग्रामसेवकांच हजर राहत नाही तर कामे करावे कसे असा प्रश्न शेतकरी - विद्यार्थी करीत आहे.ग्रामसेवक बदलीची वाट पाहत आहे.तर सदर ग्रामसेवकावर बि.डि.ओ चा वरदहस्त असल्याचे बोलल्या जात आहे.जिल्हा परिषद सि.ई.ओ.लक्ष पुरवावे अशी मागणी होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !