डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा इयत्ता 12 वी परीक्षेत घवघवीत यश.
★ विज्ञान शाखेतून तन्वी चिलबुले 93.33%घेऊन प्रथम.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,21/05/2024 नुकत्याच 12 व्या वर्गाच्या घोषीत झालेल्या निकाला मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य , विज्ञान महाविद्यालयाने उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या एच एस सी नागपूर बोर्ड इयत्ता 12 वी चा विज्ञान शाखेचा 99.48 टक्के,कला शाखेचा 76.40 टक्के तर वाणिज्य शाखेचा 93. 87 टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून तन्वी अरविंद चिलबुले 93.33%घेऊन प्रथम तर दुसरी सायली ओमप्रकाश निखारे 89.66%, तिसरा क्रमांक स्नेहा यशवंत पंचभाई 89.33% प्राप्त केले.कला शाखेतून प्रथम आदित्य राजकुमार बोरकर 79.33% द्वितीय मानसी मदन मेश्राम 67% तृतीय श्र्वेता महेश बुराडे 62.67% गुण घेतले तर वाणिज्य शाखेतून प्रथम कार्तिक भास्कर किरीमकर 74.33% द्वितीय लक्ष्मी धनराज उरकुडे 73.67% तर तृतीय पवन दिवाकर भागडकर 66.83% गुण प्राप्त करून महाविद्यालयाची निकालाची उत्तम परंपरा कायम ठेवली आहे.
प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कांबळे उपाध्यक्ष डॉ.राजेश कांबळे संस्थेचे सदस्य रीमा कांबळे डॉ. स्निग्धा कांबळे तसेच संस्थेचे संपूर्ण सदस्य त्याचबरोबर महाविदयालयाचे पर्यवेक्षक प्रा.उके तसेच प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व उतीर्ण विदयार्थ्यांचे अभीनंदन केले व भवीष्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.