देश वाचवायचा आणि बेकारी कमी करायची आणि हाताला काम पाहिजे असेल तर पंजाला मतदान करा. - डॉ.नामदेवराव किरसान यांचे जनतेला आव्हान
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१५/०४/२०२४ गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र इंडिया संयुक्त आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉ नामदेवराव दसाराम किरसान अ-हेरनवरगाव येथे काल झालेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत पटांगणावर झालेल्या प्रचार सभेत त्यांनी अ-हेरनवरगाव वाशीय जनतेला पंजाला मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले.
त्यांनी आपल्या भाषणात विद्यमान सरकारच्या कार्यकाळात जनतेला दिलेल्या खोट्या आश्वासनांचा पाढा जनतेला वाचून दाखविला . तसेच या दहा वर्षाच्या काळात विद्यमान खासदार यांनी किती वेळा आपल्या गावाला भेटी देऊन तुमच्या अडीअडचणी समजावून घेतल्या आणि सोडविल्या हा प्रश्न त्यांनी जनतेला विचारला तसेच त्यांनी जातीची खोटी प्रमाणपत्र सादर करून आजपर्यंत खासदारकी भोगली आणि म्हणून तुम्ही आता तरी जागे होऊन पंजाला मतदान करा.
काँग्रेस सरकार सत्तेत आली तर तीस लाख सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी , गरीब महिलांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करण्याचे,शेतीमालाला योग्य भाव , महागाई कमी, स्वयंपाकाचा गॅसच्या किमती कमी, करण्याचे आणि इतर लोकोपयोगी वस्तूंच्या किमती कमी करण्याचेआश्वासन व अन्य इतर आश्वासने या प्रचार सभेत दिली.
या प्रचार सभेत माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ सतीश वार्जुरकर, माजी सभापती नेताजी मेश्राम यांनी सुद्धा जनतेला पंजावर बटन दाबून विक्रमाणे उच्च विद्या विभूषित गडचिरोली चिमूर निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार डॉ, नामदेवराव किरसान यांना निवडून आणण्यासाठी मतदान करावे असे आवाहन या प्रचार सभे प्रसंगी केले.
या प्रचार सभेत व्यासपीठावर पक्ष कार्यकर्ते गुड्डू बगमारे,थानेश्वर कायरकर, हसन भाई गिलानी, वामन मिसार सामाजिक कार्यकर्ता अ-हेर नवरगाव, गुड्डू बगमारे, राजेश तलमले, मंगलाताई टिकले,स्मिता पारधी, दामिनी चौधरी सरपंच अ-हेरनरगाव उपस्थित होते.
सदर प्रचार सभेचे सूत्रसंचालन प्राध्यापक,विनीत ठेंगरे यांनी केले.