साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक. ★ गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई केली.

साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक.

 

★ गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई केली. 


एस.के.24 तास


गडचिरोली : साडेपाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन जहाल महिला नक्षलवादी आणि एका समर्थकाला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.गडचिरोली पोलिसांच्या सी-६० पथकाने महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील जंगल परिसरात ही कारवाई केली.


काजल ऊर्फ सिंधू गावडे वय,२८ वर्ष रा.कचलेर ता. एटापल्ली जिल्हा,गडचिरोली व गीता ऊर्फ सुकली कोरचा वय,३१ रा.रामनटोला ता.एटापल्ली जिल्हा,गडचिरोली असे महिला नक्षलवाद्यांची नावे आहेत.


पिसा पांडू नरोटे रा.झारेवाडा ता.एटापल्ली जिल्हा, गडचिरोली असे समर्थकाचे नाव आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्याचा उद्देशाने गडचिरोलीमध्ये नक्षलवादी सक्रिय झाले आहेत.त्यांचे मनसुबे उधळून लावण्यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली असून मागील तीन महिन्यांपासून नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.दरम्यान, महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील पिपली बुर्गी पोलीस ठाणे हद्दीतील जवेली जंगलात दोन जहाल महिला नक्षलवाद्यांना सी- ६० पथकाने ७ एप्रिलला ताब्यात घेतले, या सोबतच गिलनगुडा जंगल परिसरातून समर्थकाच्या मुसक्या आवळणल्या. 

या तिघांवरही महाराष्ट्र सरकारने तब्बल साडे पाच लाखांचे बक्षीस ठेवले होते. 


२०२० मध्ये कोपर्शी - पोयारकोटी जंगल परिसरात चकमक झाली होती. 

त्यात एक अधिकारी व एक जवान शहीद झाले होते. 

या चकमकीत काजल गावडे व गीता कोरचा या दोघींचा प्रत्यक्ष सहभाग होता,असे चौकशीत निष्पन्न झाले.

काजल ऊर्फ सिंधू गावडे ही २०१२ मध्ये वयाच्या १४ व्या वर्षीच नक्षलवादी चळवळीत दाखल झाली. 

प्लाटुन क्र.५५ मध्ये सदस्य या पदावर भरती होऊन सन २०१९ पर्यंत कार्यरत होती. 

२०१९ मध्ये कंपनी क्र. ४ मध्ये बदली होऊन सन २०२० पर्यंत सदस्य पदावर होती. 

त्यानंतर ती डिव्हीजनल कमिटीत सदस्य पदावर होती.

 तिचा सात चकमकींत सहभाग होता. 

कनेली वपुसेर साखरदेव जंगल परिसरात शस्त्रे जमिनीत पुरुन ठेवल्याचाही आरोपही तिच्यावर आहे. 

तर गीतावर पाच गुन्हे असून ती २०१८ मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सप्टेंबर २०२० पर्यंत कार्यरत होती. 

सप्टेंबर २०२० मध्ये माड एरीयामध्ये बदली होऊन ती सदस्य पदावर आतापर्यंत कार्यरत होती. 

चकमकीच्या तीन गुन्ह्यांत तिचा सहभाग होता.

 एका पोलीस जवानाच्या व निरपराध नागरिकाच्या हत्येचाही तिच्यावर आरोप आहे. 

समर्थक पिसा नरोटे वर देखील खूना सह विविध गुन्हे दाखल होते. 


पोलीस अधीक्षक नीलोत्पल,यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !