स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने मुंबई येथे सन्मानित.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई हे नेहमीच समाजसेवेची कास धरून गावात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात. त्यांना समाजसेवेचा वारसा त्यांचे दानशूर पणजोबा समाजसेवक नागोबा पाटील वाढई यांच्या कडून मिळालेला असल्याने सर्वप्रथम दानशूर पणजोबांचे स्मारक बांधले. कळमना ग्रामपंचायत ची सुरुवात दररोज राष्ट्रगीताने करण्यात येते.
त्यांनी गावात स्मशानभूमी मध्ये आकसीजन पार्क उभारले असून जेष्ठ नागरिकांसाठीही पार्क उभारले आहे.गावांमध्ये सी. सी. टिव्ही कमेरे लावले आहेत.ते नेहमी ध्वजारोहणाचा मान गावातील समाजसेवा करणाऱ्या होतकरू तरुणांकडून,कधी जेष्ठ नागरिकांकडून,कधी जेष्ठ महिलांकडुन करून घेतात.
त्यांनी गावातील शाळा सुंदर केली, येथे अनेक पायाभूत सुविधा, अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. जनतेला शुध्द पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आरो वाटर प्लांट उभारले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करुन,पेव्हर ब्लॉक बसवून सुशोभित करण्यात आले आहे.
गावातील उघडे गटारे बंदिस्त करून आरोग्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे.घंटागाडीची सोय, उत्तम घनकचरा व्यवस्थापन,कोल्हापुरी गाजेट बंधारे बांधून पाणी टंचाईवर मात असे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवून स्वच्छ,सुंदर, हिरवगार आणि पर्यावरण युक्त गाव करण्यासाठी त्यांची धडपड,सामाजिक बांधिलकी बघता मुंबई येथे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातील नागरिकांकडून त्यांच अभिनंदन करण्यात येत असून अशाच प्रकारचे सरपंच गावागावात निर्माण झालेत तर ग्रामीण भागातील ग्राम पंचायत चा कायापालट झाला शिवाय राहणार नाही अशी भावना परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.