इतिहासातील प्रेमकथा मानवी वर्तनात सकारात्मक बदल घडवीणाऱ्या. - प्रा.डॉ.मोहन कापगते.

इतिहासातील प्रेमकथा मानवी वर्तनात सकारात्मक बदल घडवीणाऱ्या. - प्रा.डॉ.मोहन कापगते.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : २७/०४/२४ अ-हेरनवरगाव - २६ एप्रिल२४.भारतीय इतिहासातील प्रेमकथा या मानवी वर्तनात सकारात्मक बदल घडवीणाऱ्या ठरल्या. राधा-कृष्ण, सम्राट अशोक - कौरवकी, कालिदास - विदयोत्तमा,जोधा-अकबर, शहाजहान-मुमताज, बाजीराव - मस्तानी इत्यादी अनेक प्रेमकथा अजूनही लोकांच्या स्मरणातून गेल्या नाहीत. आजही या स्मारकांच्या, काव्य व साहित्य आणि प्रतिकांच्या रूपात जिवंत आहेत.  प्रेमकथांमधील इतिहास लक्षात घेता हा इतिहास एकमेकांप्रती समर्पणाचा, त्यागाचा व नवनिर्मितीचा दिसून येतो. असे विचार प्रा. डॉ.मोहन कापगते यांनी मांडले ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे स्व. श्री. किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमालेत वक्ते म्हणून "इतिहासातील प्रेमकथा आणि स्मारके" या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील अकरा प्रेमकथा व त्यांच्या स्मारकांचा इतिहास पॉवर पॉईंट प्रेझेंटेंशनद्वारे सचित्र उलगडून सांगितला.

    

याप्रसंगी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. कृष्णा राऊत होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकार, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ.वर्षा चंदनशिवे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कृष्णा राऊत यांनी इतिहासातील प्रेमकथा हा संकोचून सांगण्याचा विषय नसून तो उलगडून अधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन केले.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंदनशिवे यांनी केले. संचालन प्रा. मनीषा लेनगुरे यांनी तर आभार प्रा. बंडू गेडाम यांनी मानले. कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ. देवीदास जगनाडे, प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, कवी डॉ. धनराज खानोरकर, प्रा. विनोद नरड आणि बहुसंख्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. - २६ एप्रिल२४.भारतीय इतिहासातील प्रेमकथा या मानवी वर्तनात सकारात्मक बदल घडवीणाऱ्या ठरल्या. राधा-कृष्ण, सम्राट अशोक - कौरवकी, कालिदास - विदयोत्तमा,जोधा-अकबर, शहाजहान-मुमताज, बाजीराव - मस्तानी इत्यादी अनेक प्रेमकथा अजूनही लोकांच्या स्मरणातून गेल्या नाहीत. 


आजही या स्मारकांच्या, काव्य व साहित्य आणि प्रतिकांच्या रूपात जिवंत आहेत.  प्रेमकथांमधील इतिहास लक्षात घेता हा इतिहास एकमेकांप्रती समर्पणाचा, त्यागाचा व नवनिर्मितीचा दिसून येतो. असे विचार प्रा. डॉ. मोहन कापगते यांनी मांडले ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे स्व. श्री. किसनलालजी भैया स्मृती व्याख्यानमालेत वक्ते म्हणून "इतिहासातील प्रेमकथा आणि स्मारके" या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी इतिहासातील अकरा प्रेमकथा व त्यांच्या स्मारकांचा इतिहास पॉवर पॉईंट प्रेझेंटेंशनद्वारे सचित्र उलगडून सांगितला.

    

याप्रसंगी व्यासपीठावर सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. कृष्णा राऊत होते. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे, उपप्राचार्य डॉ. सुभाष शेकोकार, व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष डॉ. वर्षा चंदनशिवे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. कृष्णा राऊत यांनी इतिहासातील प्रेमकथा हा संकोचून सांगण्याचा विषय नसून तो उलगडून अधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचा विषय असल्याचे प्रतिपादन केले.

  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.चंदनशिवे यांनी केले. संचालन प्रा. मनीषा लेनगुरे यांनी तर आभार प्रा. बंडू गेडाम यांनी मानले.कार्यक्रमात माजी प्राचार्य डॉ. देवीदास जगनाडे,प्राचार्य डॉ. एन. एस. कोकोडे, कवी डॉ. धनराज खानोरकर, प्रा. विनोद नरड आणि बहुसंख्य प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !