कार्यकर्त्यांनी ताकदीने निवडणूकिला सामोरे जाऊन किल्ला लढवावा. - संदीप पाटील गड्डमवार
★ जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी यांचा सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक : ०५ एप्रिल २०२४ गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेव दसाराम किरसान यांच्या प्रचारार्थ आज सावली शहर काँग्रेस कमिटीतर्फे कार्यकर्ता संवाद बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा माजी उपाध्यक्ष जि.प.चंद्रपूर मा.संदीप पाटील गड्डमवार यांच्या प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शनाखाली सावली येथे पार पडली.
यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे, विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा.नितीन दुवावार, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,जेष्ठ काँग्रेस पदाधिकारी मा.प्रशांत राईंचवार,मा.बबन वाढई,मा.दिलीप शेंडे,आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना मा.संदीपभाऊ गड्डमवार यांनी "2024 मध्ये मौनी बाबा तथा निष्क्रिय खासदाराला निरोप देण्याची वेळ आली आहे. यंदा एक सुजाण व सज्ञान उमेदवाराला मत देऊन गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील जनता आपला खासदार निवडतील ही खात्री आहे. गेली 10 वर्षे भाजपने गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रात जो अशोक नेते यांच्या रूपाने उमेदवार दिला. त्यांना केवळ मोदी यांच्या नावाने क्षेत्रातील मतदारांनी भरघोस प्रतिसाद मताधिक्याने निवडून दिले. अशोक नेते हे केंद्रातील सरकार कडून भरघोस निधी आणून क्षेत्राचा विकास साधणार अशी सर्वांगी अपेक्षा व्यक्त होत होती.
माञ जनतेच्या समस्या, मूलभूत प्रश्न यांची तिळमात्र हि जाण न ठेवणाऱ्या खासदार अशोक नेते यांनी सम्पूर्ण क्षेत्रातील मतदारांचा भ्रमनिरास केला आहे.त्यामुळे तिसऱ्यांदा त्यांना मत देऊन आणखी पुढील ५ वर्ष वाया जाऊ द्यायचे नाही हा निर्धार जनतेने केला आहे असे प्रतिपादन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका सौ.राधाताई ताटकोंडवार यांनी केले तर आभार मा.नितीन दुवावार यांनी मानले,यावेळी सावली शहर काँग्रेस कमिटीचे सन्मानीय पदाधिकारी,नगरसेवक- नगरसेविका महिला आघाडी,युवक- युवती तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्तागण उपस्थित होते.