रामपुरी (येवली) येथील युवकाचा कोळवाडी येथे क्रेन ची वायर तुटल्याने क्रेन विहिरीत कोसळून जागीच ठार झाला ; दुसऱ्या जखमी चा मृत्यू.

रामपुरी (येवली) येथील युवकाचा कोळवाडी येथे क्रेन ची वायर तुटल्याने क्रेन विहिरीत कोसळून जागीच ठार झाला ; दुसऱ्या जखमी चा मृत्यू.


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालय पासून 12 किमी अंतरावर असलेल्या येवली (रामपुरी) येथील युवक,अंकुश प्रभाकर गेडाम वय,30 वर्ष रा.रामपुरी (येवली) हा युवक कामासाठी गेला होता.पण नियतीने मान्य नसल्याने काळाचा घाला घातला.त्याच्या कुटुंबामध्ये पत्नी,लहान 2 वर्षाचा  मुलगा आहे.


जलजीवन योजनेतील विहिरीचे काम सुरू असताना वायर रोप तुटून क्रेन विहिरीत पडली.या दुर्घटनेत एक कामगार जागीच मृत्यू झाला.तर एक जण गंभीर जखमी असून विहिरीत अडकलेल्या सर्व कामगारांना सुरक्षित करण्यात यश आले आहे. 


कामगार गडचिरोली जिल्ह्यातील तसेच काही परप्रांतीय असून घटनेमध्ये दोन महिला,आठ पुरुषांचा समावेश आहे.कोळवडी ता.भोर येथील नसरापूर वेल्हा रोड लगत असणाऱ्या ओढ्यात विहिरीचे खोदकाम सुरू असून ही सोमवार दि.29/04/2024 दुपारी 1: 30 वा.वाजण्या च्या सुमारास ही घटना घडली.


श्री.अंकुश प्रभाकर गेडाम वय,30 वर्ष रा.रामपुरी (येवली) ता.जिल्हा,गडचिरोली असे मृत्यु झाला.पडलेल्या तरुणाचे नाव आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी व लहान मुलगा 2 वर्षाचा आहे.

श्री.विजेंद्र रामानंद भारद्वाज वय,49 वर्ष रा.उत्तरप्रदेश असे चिंताजनक असलेल्या गंभीर जखमी असलेले याचा ही मृत्यू झाला. 


मात्र इतर सुरक्षित वाचवलेल्या कामगारांची नावे समजू शकले नाही. घटना घडल्यानंतर दुसरी क्रेनच्या साह्याने विहिरीत अडकलेल्या इतर कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.विहिरीचे खोदकाम करताना दुपारची जेवणाची सुट्टी नंतर क्रेनच्या बकेट मध्ये बसवून कामगारांना खाली सोडत असताना अचानक क्रेनची वायर रोप तुटून जवळपास 50 फुट खाली बकेट पडली.


वायर रोपचा लोखंडी हुक डोक्यात पडल्याने बकेट मधील श्री.अंकुश प्रभाकर गेडाम हे जागीच ठार झाले.घटना घडल्यानंतर घटनास्थळी गावचे पोलीस पाटील अजित शिंदे,प्रमोद शिंदे व इतर कामगारांनी रुग्णवाहिका बोलून जखमींना सिद्धिविनायक रुग्णालयात नेण्यात आले.तसेच विहिरीत इतर काम करत असलेले कामगारांना दुसऱ्या क्रेनच्या साह्याने खाटेवर बसवून बाहेर काढण्यात आले.त्यांना रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन करून मुळ गाव रामपुरी(येवली) येथे आणण्यात येत आहे.


सुदैवाने इतर कामगार वाचले : - 

क्रेन च्या साह्याने बकेट मधून कामगारांना खाली सोडण्यात येत होते यावेळी विहिरीत अगोदरच कामगार एका कडेला सावलीत उभे होते तर बकेट दुसऱ्याकडे  पडल्याने सुदैवाने कामगारांच्या अंगावर बकेट पडले नाही यामुळे इतरांचे प्राण वाचले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !