श्रीमद् देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्त्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताहाचे हनुमान देवस्थान येथे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : २४/०४/२०२४ हनुमान देवस्थान अ-हेरनवरगाव येथे हनुमान जयंतीचे औचित्य साधून दि. १९/०४ /२४ रोजी सु श्री साध्वी दिलाशा मेघशाम ठलाल व संच मु. कढोली जिल्हा गडचिरोली यांचे हस्ते घटस्थापना करून मंजुळ वाणी द्वारे भागवत प्रवचनाचा कार्यक्रम दि.२५/०४/२४ गोपाल काला व महाप्रसादाच्या दिवसापर्यंत आयोजन करण्यात आले आहे.
गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून मान. अनिल जळगावकर पोलीस निरीक्षक पो.स्टे.ब्रह्मपुरी ,गोवर्धन दोनाडकर पत्रकार , अमरदीप लोखंडे, अॅड हेमंत उरकुडे, प्रमोद चिमूरकर माजी जि. प.सदस्य, उमेश धोटे सरपंच ग्रामपंचायत चौगान,धनराज मुंगले
प्रशांत राऊत पत्रकार,संजू भाऊ बगमारे, सुरेशआडकिने, सौ. दामिनी चौधरी सरपंच अ-हेरनरगाव ,श्रीकांत पिलारे ग्रामपंचायत सदस्य, कृष्णा सहारे माजी जि. प. सदस्य , विलासजी उरकुडे पंचायत समिती माजी सदस्य ,संतोष नंदुरकर, वामनरावजी मिसार, अकुल राऊत पोलीस पाटील अ-हेर नवरगाव, नानाजी बगमारे माजी पोलीस पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सदर गोपाल काला व महाप्रसादाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन हनुमान देवस्थान सेवा समिती विश्वस्त अध्यक्ष ब्रम्हदास जी सावजकर सचिव प्रभुजी कुथे व इतर पदाधिकारी यांनी जनतेला केले आहे.