डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञावंत म्हणून बुध्द,फुलेंचा वारसा पुढे नेला.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा. - डॉ.दिलिप चव्हाणांचे प्रतिपादन


डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रज्ञावंत म्हणून बुध्द,फुलेंचा वारसा पुढे नेला.डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा. - डॉ.दिलिप चव्हाणांचे प्रतिपादन 


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : १७/०४/२०२४ " प्राचीन,मध्ययुगीन व आधुनिक अशा तीन टप्प्यांनी भारतीय समाज पुढे येतो.भारताचा इतिहास हा विवादाचा समाजवादाचा इतिहास आहे आणि म.फुले व बाबासाहेब दोघेही इतिहासकार आहेत. बाबासाहेबांनी बुध्दाला क्रांतीकारक म्हंटले.ते संतपरंपरेला नाकारत नाही.ते संघर्ष करीत समता,

बंधूता,न्यायासाठी लढले.त्यांनी ही सूत्रे बौध्द तत्वज्ञानातून घेतली. शेतमजूर,कामगार, वंचितांसाठी लढले.बौध्द भिख्खू अरहत (पूर्णवेळ) क्रांतीकारक होते.बुध्द मार्गदाता आहे मुक्तीदाता नाही  म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रज्ञावंत म्हणून बुद्ध,फुलेंचा हा वारसा पुढे नेला." असे बहूमोल विचार  नांदेडचे डॉ.दिलिप चव्हाणांनी मांडले.ते पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

     

विचारपीठावर अध्यक्षस्थानी मुबंईचे मा. दादाभाऊ अभंग तर उपस्थितीत समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके,उपाध्यक्ष सुधिर अलोणे,सचिव डॉ. युवराज मेश्राम,सहसचिव सुधाकर पोपटे, कोषाध्यक्ष के.जी.खोब्रागडे,संघटक नेताजी मेश्राम,महिला संघटक छाया जांभूळे इ.मान्यवर उपस्थित होते.

    

याप्रसंगी कलावंत भीमानंद मेश्राम व महाबीज जिल्हाव्यवस्थापक  सुभाष मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय मनोगतात दादाभाऊ अभंग म्हणाले की, "बाबासाहेब व्यक्ती नसून विचारधारा आहे.त्यांनी गावकुसाबाहेरची माणसं शहरात आणली.शेती राष्ट्रीय संपत्ती मानून शेतक-यांच्या हितासाठी मोर्चा काढला. महिला,कामगारांसाठी संघर्ष केला.सर्व जाती धर्मासाठी बाबासाहेब आंबेडकर लढत राहिले.ते राष्ट्रपुरुष होते.संविधानाच्या माध्यमातून सर्वांना त्यांनी न्याय मिळवून दिला."असे विचार व्यक्त केले 

     

प्रस्ताविक,पाहूण्यांचा परिचय व कार्यक्रमाची भूमिका समितीध्यक्ष अशोक रामटेकेंनी मांडली.संचालन समिती सचिव डॉ.युवराज मेश्रामांनी केले.तर आभार छाया जांभूळेंनी मानले.कार्यक्रमाला कवी प्रभूजी राजगडकर,प्राचार्य डॉ एन एस कोकोडे, प्राचार्य डॉ एस आर रामटेके, डॉ ई.एल.रामटेके,डॉ धनराज खानोरकर


इजि.विजय मेश्राम डॉ चंद्रशेखर बांबोळे,अंकुश वाघमारे,प्रा संतोष रामटेके,डॉ गेडाम असे अनेक मान्यवर उपस्थित होते.यशस्वीतेसाठी आसाराम बोदेले,अँड नंदा फुले,अमरदीप मेश्राम,आनंद गणवीर,दिनेश लोखंडे,डी.एम.सोनदौले,नरेंद्र बांते,मदन रामटेके,राजू मेश्रामांनी मोलाचे सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !