वंचित बहुजन आघाडीचे प्रचार कार्यालय सावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी.
एस.के.24 तास
सावली : वंचित बहुजन आघाडी सावली तर्फे वंचित बहुजन आघाडीचे प्रचार कार्यालय सावली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती केक कापून मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सावली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती सावली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आणि तथागत भगवान बुद्ध यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले तसेच वंचित बहुजन आघाडी सावली तर्फे ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष उल्का गेडाम,
सावली शहर अध्यक्ष रोशन बोरकर, किरण गेडाम, कांतीलाल बोरकर, संजय घडसे, भावना बोरकर, सोमकुवर मॅडम, भारती देवगडे, सपना दुधे, मनोरमा गेडाम, वंदना गेडाम, कुसुम गोंगले, विलास बोरकर, चंद्रभागा गेडाम,पाटील सर,डॉक्टर मेश्राम साहेब, मोटघरे सर,पत्रकार उदय गडकरी, आशिष दुधे,उमेश वाळके,सुमन नगारे,भैसारे मॅडम, बोरकर मॅडम, आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.