सावली येथे डॉ.नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ सभा - व्हिजेएनटी प्रदेश अध्यक्षा ऍड.पल्लवी रेनके यांचे मार्गदर्शन.
एस.के.24 तास
सावली : गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या प्रचारार्थ विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्षा ऍड. पल्लवी रेनके यांचे मार्गदर्शनात सावली येथे सभा घेण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष लता लाकडे होते.प्रमुख अतिथी सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष,बादल गायकवाड,व्हिजेएनटी विभागाचे महासचिव,सुधाकर बडगुजर, व्हिजेएनटी विभागाचे जिल्हाध्यक्ष,विजय कोरेवार,महिला तालुका अध्यक्ष,उषा भोयर,शहराध्यक्ष विजय मुत्यलवार,माजी उपसभापती,मंगला चिमड्यालवार,शहर अध्यक्ष भारती चौधरी,व सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका,पल्लवी तातकोंडावार यांनी तर आभार प्रदर्शन गुलाब गेडाम यांनी मानले.