कठोर परिश्रम व प्रज्ञेमुळे बाबासाहेब मोठे झाले जयंती कार्यक्रम. - प्राचार्य,डॉ.डी.एच.गहाणे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : १४/०४/२४ " भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर हे सर्वस्पर्शी असे व्यक्तिमत्त्व आहे.त्यांनी वंचित व उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले आयुष्य झिजविले.त्यांनी निर्माण केलेले स्वतंत्र्य भारताचे संविधान सर्व घटकांना न्याय देणारे ठरले.कठोर परिश्रम व प्रज्ञेमुळे बाबासाहेब मोठे झाले " असे मार्मिक विवेचन प्राचार्य डॉ डी एच गहाणेंनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेला माल्यार्पण करुन करण्यात आली.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ राजेंद्र डांगे,डॉ.रेखा मेश्राम,अधीक्षक संगीता ठाकरे, डॉ तात्याजी गेडाम,डॉ किशोर नाकतोडे, डॉ मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम,डॉ युवराज मेश्राम, डॉ योगेश ठावरी,डॉ अतुल येरपुडे, डॉ पद्माकर वानखडे,डॉ कुलजित शर्मा,प्रा.आनंद भोयर,डॉ ज्योती दुपारे,विनय भागडकर,सुषमा राऊत,माणिक दुपारे, निनावे इ.नी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
यानंतर बुध्दवंदनेचा कार्यक्रम पार पडला.यशस्वीतेसाठी ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.