रानटी हत्तीचा बंदोबस्त करा. - महेंद्र ब्राह्मणवाडे यांची मागणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : मागील 2 वर्षांपासून रानटी हत्तीनी जिल्ह्यात हौदास माजवला असल्याने जिल्ह्यातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. काही महिन्यापासून या रानटी हत्तीच्या हालचाली कमी झाल्या होत्या मात्र मागील 2-4 दिवसात या रानटी हत्तीच्या हालचली परत चालू झाल्याने व यात काही नागरिकांचा जिवही गेल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये अस्वस्थतेचा वातावरण निर्माण झाले आहे.
सद्या मोहफूल गोळा करण्यापासून तर तेंदपुत्ता संकलनाची सीजन सुरु झाली असल्याने नागरिकांना जंगलात जावे लागेल, अश्या या रानटी हत्तीच्या वाढत्या हल्याने नागरिक भयभीत झालेले आहे.
त्यामुळे वन प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाय करून रानटी हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.