अ-हेरनवरगाव येथे शांततेत व उत्साहाने लोकशाहीचा उत्सव शांततेत मतदान करून मतदारांनी केला साजरा.


अ-हेरनवरगाव येथे शांततेत व उत्साहाने लोकशाहीचा उत्सव शांततेत मतदान करून मतदारांनी केला साजरा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी - २०/०४/२०२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव एकेकाळी मतदानाच्या वेळेस नावारूपाला आलेल्या या गावच्या मतदारांनी काल झालेल्या गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील मतदारसंघात अगदी शांततेत, उत्साह पूर्ण  वातावरणात येथील मतदारांनी उन्हाची तमा न बाळगता मतदान आपला हक्क व अधिकार हे जाणून मतदान केले आणि लोकशाहीचा उत्सव साजरा केला. 

सदर उत्सव साजरा करीत असताना खरी लढत असलेल्या काँग्रेस व भारतीय जनता पार्टीच्या प्रतिस्पर्धी पक्षाचे कार्यकर्ते यांच्या चेहऱ्यावर मात्र कसल्याही प्रकारचा विरोधाभास नव्हता.अगदी हसत हसतच कार्यकर्ते आणि मतदार मतदान केंद्रावर जाणाऱ्यांची मोठ्या आस्थेने विचारपूस  करीत होते. 


वाटेत, मतदान करताना काही  अडचण असल्यास ती सोडवण्याची जबाबदारी सोडविण्यासाठी संपर्क साधण्याचे त्यांनी मतदारांना आवाहन केले.काही अपंग,वेळेवर प्रकृती बिघडलेले मतदार मतदान केंद्रावरती जाऊ शकले नाहीअशा मतदारांच्या  घरी व्हीलचेअर नेऊन त्यांना मतदान केंद्रावराती  आणून मतदानाचा हक्क बजविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.


अ-हेरनवरगाव येथे मतदानाचे एकूण तीन केंद्र होते.

या केंद्रावरती झालेले मतदान.

मतदान केंद्र- 41

एकूण मतदार - 1271

पुरुष- 504 

महिला- 496


 एकूण झालेले मतदान -1000 मतदानाची टक्केवारी - 

78. 67%


मतदान केंद्र - 42

एकूण मतदार- 1241

 पुरुष - 475 

महिला - 462


एकूण झालेले मतदान - 936 मतदानाची टक्केवारी 75.42%


मतदान केंद्र - 43

एकूण मतदार -1112

पुरुष - 449 

महिला-  404

एकूण झालेले मतदान - 853 मतदानाची टक्केवारी 76.70%


अहेर नवरगाव च्या संपूर्ण मतदान केंद्राची टक्केवारी अशा प्रकारे मतदान करून शासनाने जनतेला दाखवून दिलेल्या मतदान जागृतीच्या हाकेला उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि एक कधी न झालेला लोकसभेच्या मतदानाच्या इतिहासात मतदानाच्या टक्केवारीचा उच्चांक गाठला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !