ऑनलाईन क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या मोठ्या बुकिंसह १० जणांवर गुन्हा ; गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.

ऑनलाईन क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या मोठ्या बुकिंसह १० जणांवर गुन्हा ; गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई.


एस.के.24 तास


आल्लापल्ली : गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात " आयपीएल " क्रिकेटवर राजरोसपणे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करीत अहेरी व आलापल्ली येथील १० आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे.


सद्या " आयपीएल " चे सामने सुरु असल्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात " मोबाईलअँप " च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ सट्टा खेळला जातो.काही मोठे बुकी गावोगावी ‘एजंट’ नेमून त्यांच्यामार्फत हा जुगार चालवतात.या प्रकरणी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी लगेच कारवाईचे आदेश दिले होते.


पोलिसांनी ठिक ठिकाणी छापे टाकून आधी निखिल दुर्गे आणि असिफ शेख याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मोबाईल व ९ हजार रोख जप्त केले. चौकशीदरम्यान हा जुगार चालवणारे मुख्य बुकी इरफान इकबाल शेख रा. अहेरी व संदीप गुडपवार रा.आलापल्ली हे असल्याचे समोर आले.



या प्रकरणी वरील चार जणांसह आसिफ फकीर मोहम्मद शेख,धंनजय राजरत्नम गोगीवार,निखील गुंडावार,प्रणित श्रीरामवार,अक्षय गनमुकलवार,फरमान शेख,फरदिन पठाण असे एकूण दहा आरोपीवर जुगार बंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित सर्व फरार आहेत.दरम्यान,याप्रकरणी आणखी काही मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. ही कारवाई अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश उपअधिक्षक अजय कोकाटे,पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केली.


काही सूत्रधार फरार झाले आहेत : - 


ऑनलाईन जुगारामुळे जिल्ह्यातील तरुण आणि नोकरवर्ग कर्जबाजारी होऊन देशोधडीला लागला आहे. काहींनी तर दागिने,आपले घर विकून पैसे दिले आहे.यामुळे ऑनलाईन जुगाराबद्दल समाजात मोठा रोष आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे सट्टेबाजांचे धाबे दणाणले असले तरी ते काही मुख्य सूत्रधार अद्याप मोकळे आहेत. 


दोन वर्षांपूर्वी देखील अशीच कारवाई करण्यात आली होती. पण मुख्य सूत्रधारांना अभय देण्यात आले. त्यामुळे हा जुगार पुन्हा फोफावला होता. यावेळी मात्र जुगार चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !