विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे १ मे ला काळा दिवश म्हणुन पाळणार.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा शाखा,गडचिरोली १ मे १९६० ला विदर्भातील जनतेची जनभावना दुर्लक्षीत करून बळजबरीने विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करून घेतले तेव्हा पासुन कधी काळी एका राज्याची राजधानी असलेल्या विदर्भाची अधोगती सुरु आहे.
बेरोजगारी,कुपोषण,शेतकरी,आत्महत्या,तंत्र शिक्षण ,आरोग्य सेवा,दळण वळणाच्या बाबतीत विदर्भातील जनता त्रस्त आहे. विदर्भातील उच्च शिक्षित युवक आणि मजुर वर्ग रोजगार करिता मागील अनेक वर्षा पासून विदर्भा च्या बाहेर दुसऱ्या राज्यात जात आहे.
त्या मुळे विदर्भातील १ लोकसभा क्षेत्र आणि ४ विधानसभा क्षेत्रातील प्रतीनिधीत्व कमी झाले आहे. गोसेखुर्द सारखा प्रकल्प ४० वर्ष होऊन सुद्धा अपूर्ण आहे.जिल्हातील कारवाफा,तुलतुली,चेन्ना या सारखे सिंचन प्रकल्प वन कायद्यामुळे अडलेले आहेत.या करिता सरकारची विदर्भ विरोधी भूमिका जबाबदार आहे.स्वतंत्र विदर्भ राज्या करिता विदर्भ राज्य आंदोलन समिती मागिल १२ वर्षा पासुन सातत्याने आंदोलने करित आहे.
या वर्षी सुद्धा संपूर्ण विदर्भात १ मे हा काळा दिवस पाळण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समितीने घेतलेला आहे. काळी फीत लावून विदर्भ प्रेमी जनता विदर्भराज्य विरोधी भूमिकेचा निषेध करणार आहे. गडचिरोली येथे हे आंदोलन दुर्गामाता मंदिर परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारका समोर होणार आहे.
या आंदोलनात विदर्भ प्रेमी जनतेने सहकाऱ्या सह सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे,महिला आघाडी अध्यक्षा,अमिता मडावी,शहर अध्यक्ष,रमेश भुरसे,उपाध्यक्ष रमेश उप्पलवार,वेणुदास वाघरे,पांडुरंग घोटेकर,प्रभाकर वासेकर,दत्तात्रय पाचभाई,केशवराव भंडागे,दादाजी चापले,चंद्रकांत शिवणकार,कमलेश भोयर,गुरुदास भोपये,चंद्रशेखर गडसुलवार यांनी एका पत्रकातून केले आहे.