नगरी शाळेत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे जोरदार आयोजन.

नगरी शाळेत शाळा पूर्व तयारी मेळाव्याचे जोरदार आयोजन.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी काटली केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नगरी.येथे शाळा पूर्वतयारी मेळावा प्रथम घेण्यात आला,सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले आणि माता सरस्वती यांच्या फोटोला दिप  प्रज्वलन करून व मालारपण  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.




गावातील प्रतिष्ठित नागरिकांची भजन मंडळी, हारतुर्यानी सजवलेले बैलबंडी ,चार चाकी गाडी व भव्य.दिव्य मंडप, आतिषबाजी,प्रभातफेरी, दाखल पात्र मुलांची गृहभेट व पालकांचे स्वागत हे आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले,प्रत्यक्ष मान्यवरांनी दाखलपात्र मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या आई बाबांचा सत्कार करून मुलांसह त्यांना मानसन्मानाने शाळेत आणण्यात आले ,त्यानंतर त्या मुलांचं शाळेच्या प्रवेशद्वारावर स्वागत करून त्यांचे एक ते सात क्रमांक स्टॉल  वर चाचणी घेण्यात आली व नोंद घेण्यात आली.



अशा या भरगच्च कार्यक्रमांमध्ये माता पालक भगिनी ,स्वयसेवक, लिडर माता,ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष: आदरणीय राजूभाऊ नैताम, उपाध्यक्ष सौ: स्वातीताई मेश्राम, सदस्य :वर्षा असोदेकर, रसिका मेश्राम, ज्योती कोटगले, लोपा  बारसाकडे, दिलीप सातपुते, रंजीत बारसागडे शारदा कोटगले, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या सरपंच आदरणीय सौ,भूमिकाताई बारसाकडे सदस्य. अजय पाटील मशाखेत्री, राहुल मशाखेत्री,अनुसया स्वाती वाघरे,आसाराम भोयर,ईत्यादी मान्यवर व्यक्ती उपस्थित होते.


कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री राजू घुगरे, संचलन विषय शिक्षिका सुषमा मडावी, आभार हर्षलता कुमरे,व व सहयोग विलास भोयर शिक्षक व सर्व विद्यार्थी,पालक ,आरोग्य विभाग,इत्यादींचे सहकार्य मिळाले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !