काँग्रेसचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांची "चाय पे चर्चा "
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली -चिमूर लोकसभा निवडणूक 2024, काँग्रेस इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांनी मॉर्निग वॉक दरम्यान गडचिरोली शहरातील जेष्ठ आणि प्रतिष्ठित नागरिकांच्या भेट घेउन " चाय पे चर्चा केली " चर्चे दरम्यान नागरिकांच्या समस्या आणि अडचणी समजून घेतल्या व येणाऱ्या पिढीच्या उज्वल भविष्याकरीता,लोकशाही च्या रक्षणाकरीता मतदान रुपी आशीर्वाद मागितले.
यावेळी सोबत जिल्हा सचिव सुनील चडगुलवार, काँग्रेस नेते देवाजी सोनटक्के,अनुसूचित जाती सेल अध्यक्ष,रजनीकांत मोटघरे,चारू पोहने सह इतर पदाधिकारी सोबत उपस्थित होते.