बिजेपीच्या मोदीनी देशाचे वाटोळे केल.म्हणुन डॉ. किरसानला लोकसभेत पाठवा. - विजयभाऊ वडेट्टिवार.

बिजेपीच्या मोदीनी देशाचे वाटोळे केल.म्हणुन डॉ. किरसानला लोकसभेत पाठवा. - विजयभाऊ वडेट्टिवार. 


गडचिरोली मुनिश्वर बोरकर 


कुरखेडा _ भारतीय जनता पार्टीने १० वर्षात देशाचे वाटोळे केल आणि अंबानी - अदानीला श्रीमंत केल. आज गॅस सिलेंडरचा भाव काय आहे. घरकुलाला रेती मिळत नाही रेतीचा भाव काय आहेत. जिवनावश्य वस्तुचे भाव गणणाला भिडले आहेत . शेतकऱ्यांची दैनिय अवस्था आहे. 

शेतकरी कर्जबाजारी होत आहे. धानाला भाव नाही. बेरोजगारांना रोजगार मिळत नाही. कुरखेड्याची बत्ती गुल होते. सांगा ना भाजपावाल्यांना म्हणूनच आज डॉ. किरसान सारख्या होतकरू व्यक्तीना लोकसभेत पाठवा. अभी नही तो कभी नही. डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी आम्हाला दिलेल संविधान धोक्यात आहे. हे अनु.जातीच्या लोकांना समजते तुम्हाला कधि समजेल. संविधान वाचवायचे असेल तर तुमच्या एकजुटीची ताकद घ्या संविधान फक्त आणि फक्त कांग्रेसच वाचवू शकतो 


अश्या प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन कांग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या कुरखेडा येथील प्रचार सभेत गरजले. चिमुर - गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राची प्रचार सभा कुरखेडा येथे पार पडली . सभेला विरोधी पक्ष नेते विजयभाऊ वडेट्टिवार , कांग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेवराव किरसान , माजी आमदार आनंदराव गेडाम ' शिवसेनेचे प्रमुख सुरेंद्र चंदेल '  कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे , जिवन नाट ' माजी सभापती टिकले , भाकपचे डॉ. महेश कोपूलवार , रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर , अभारिप चे रोहीदास राऊत ' आदि प्रमुख वक्त्याची भाषणे झालीत.


 याप्रसंगी डॉ. किरसान म्हणाले की, लोकसभा निवडणुक लढविणे हि साधी गोष्ट नाही. आणि तो लोकसभेत जनतेचे प्रश्न सोडविणे सुद्धा. तेव्हा काही अश्या बिनडोक व्यक्तीला लोकसभेत न पाठवता.जो लोकसभेत आवाज उठवू शकतो. ज्याला जनतेचे समस्याची जॉन आहे अश्या व्यक्तीना आपण निवडून घ्यावे असे सांगीतले.कार्यक्रमाचे संचलन इंदुरकर गुरुजी यांनी केले कार्यक्रमास बहुसंख्य लोक उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !