निवडणूक कर्तव्यावर असून दारूच्या नशेत गोंधळ घालून मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या प्रकरणी. ★ उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

निवडणूक कर्तव्यावर असून दारूच्या नशेत गोंधळ घालून मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या प्रकरणी.


★ उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.


एस.के.24 तास


यवतमाळ : महागाव येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागात कार्यरत उपअभियंत्याने निवडणूक कर्तव्यावर असताना मद्य प्राशन करून गोंधळ घातला. गुरूवारी महागाव येथील शासकीय धान्य गोदाम क्र.२ येथे ही घटना घडली असून या प्रकरणी उपअभियंता माधव उघडे वय,५० वर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.


हिंगोली - उमरखेड लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या महागाव तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रासह मतदान केंद्रावर जाणाऱ्या साहित्याचे सिलिंग करून त्याच्या नोंदी घेण्याचे काम महागाव येथील शासकीय धान्य गोदामात सुरू आहे.या ठिकाणी माधव गोविंद उघडे हे कर्तव्यावर असताना त्यांनी दारूच्या नशेत गोंधळ घातला.मशीन चुकीच्या पद्धतीन सील केल्या.


हा प्रकार उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी डॉ. सखाराम मुळे यांना कळविण्यात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार देण्याचे निर्देश दिले.त्यावरून नायब तहसीलदार वैभव पवार यांनी माधव उघडे यांच्याविरोधात उमरखेड पोलिसांत तक्रार दाखल केली.पोलिसांनी माधव उघडे यांच्याविरोधात कलम १३४ लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ व कलम ८५ दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली.


 माधव उघडे याची उमरखेड येथील कुटीर रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करून त्यांचे नमूने न्यायवैद्यक प्रयोगशाळा अमरावती येथे पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.या घटनेने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !