एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा " हार्टअटॅक " आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २३ एप्रिलरोजी उघडकीस आली. सूरज सुरेश निकुरे वय,२४ वर्ष रा.भिकारमौशी असे मृत युवकाचे नाव आहे.
पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सूरज हा गडचिरोली येथे खोली करून राहत होता.सकाळी ६ वाजता तो नियमित जिल्हा क्रीडांगणावर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी जात होता.दरम्यान,मंगळवारी सकाळी सराव करताना काही अंतर धावल्यानंतर त्याच्या छातीत दुखण्यास सुरुवात झाली.
त्यानंतर तो मित्रां सोबत शिवाजी महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या मेडिकलमध्ये औषधी घेण्यासाठी गेला. मात्र, त्याच ठिकाणी तो चक्कर येऊन पडला.त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.सूरज च्या मृत्यूमुळे भिकारमौशी गावात शोककळा पसरली असून कटुंबियाने एकच टाहो फोडला.